सांगली जिल्हा परिषदेमधील वाघोबाला हवंय बंद पाकीटामधून मलिदा. वाघोबा कधीपासून खाऊ लागला मलिदा... जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संशोधन करावे, अशी हाक जत तालुक्यातील तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून होत आहे. जत तालुक्यामध्ये ११ प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्याअंतर्गत १२ उपकेंद्रे आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर मिळत नसल्याने नाईलाजास्तव तात्पुरत्या स्वरुपातील अकरा महिन्यांच्या करारावरती एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक केली जात आहे.
फक्त उमदीतच कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नेमणूक
सध्या तालुक्यात फक्त उमदी याच ठिकाणी कायमस्वरुपी अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. उपकेंद्रच्या सीएचओकडून दर महिन्याला पगार काढण्यासाठी ५०० रुपये वर्गणी जमा करून जिल्हा स्तरावर दिली जाते अशी चर्चा आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ३०० च्या वर उपकेंद्र आहेत.
पुर्णवेळ अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त
तालुक्यामध्ये पूर्णवळ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी जागा रिक्त आहेत. अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा ऑर्डर घ्यावी लागते. पुनर्नियुक्ती मिळण्यासाठी १ महिन्याचा पगार बंद पाकिटात घालून सांगली ऑफिसला द्यावा लागतो. अशी चर्चा आहे. बंद पाकीट दिले तरच पुनर्नियुकी मिळते अन्यथा त्यांना कात्रजचा घाट दाखवला जातो.
फलटण घटना घडायला नको
फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. तोच फलटण मधील घटनेसारखीच आणखी एक घटना सांगलीमध्ये घडत असल्याचे समोर आले आहे. येथे काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरला पोस्टमॉर्टम रिपोर्ट न बदलल्याने वरिष्ठ डॉक्टरांकडून मानसिक त्रास दिला जात आहे. या छळाला कंटाळून या महिला डॉक्टरने मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री व महिला आयोगाकडे न्याय मागितला आहे. दीड वर्षांपूर्वी डॉ.नम्रता तळेकर यांची जत तालुक्यातील उमदी प्राथमिक केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. प्रोबेशन कार्यकाळात डॉ. नम्रता यांनी जिल्हा आणि तालुका अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यास नकार दिला असल्याचे सांगतात. डॉ.नम्रता यांनी स्पष्ट केले की प्रसूती रजेवर असतांना वरिष्टाकडून छळ सुरूच होता.कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर वरिष्ठानी पैसेही मागितले पण त्यांनी देण्यास नकार दिला.
वेळेवर उपचार नाहीत
प्राथमिक आरोग्यकेंद्रात औषध उपचार मिळत नाहीत. औषधे संपल्यानंतर जिल्हा परिषदेकडून वेळेत औषध पुरवठा होत नाही. याकडे वरिष्ठ लक्ष देत नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.