Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासदार संजय राऊत अन् DCM एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

खासदार संजय राऊत अन् DCM एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा


मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  तोंडावर आल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारामध्ये एकमेकांची उणी -धुणी काढणाऱ्या दोन नेत्यांची भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे. एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीमुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले असून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. अचानक झालेल्या या भेटीमुळे चर्चा रंगल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची भेट झाली. शिवसेनेच्या फुटीनंतर हे दोन्ही नेते कोणत्याही राजकीय कटुतेशिवाय एकमेकांशी संवाद साधताना दिसले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये शिंदे गटाविरोधात झालेली भाजप-काँग्रेसची आघाडी, अकोट नगर परिषदेत झालेली भाजप-एमआयएम युतीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे.

शिवसेनेमध्ये उभी फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाने जोरदार निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह बंडखोरीचे राजकारण केले. यानंतर केले्या गुवाहटी वारी आणि महायुतीमध्ये सरकार स्थापन केल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. तसेच 2022 मध्ये झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले. 50 कोटी रुपये घेत या नेत्यांनी बंडखोरी केली असा आरोप राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या नेत्यांवर केला होता. 

त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह घेतल्यामुळे खासदार संजय राऊतांनी अनेकदा एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. पालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील दोन्ही शिवसेनांनी एकमेकांवर निशाणा साधला. मात्र निवडणुकीच्या काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे. अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे समोर आल्यानंतर खासदार राऊत यांनी त्यांच्यासोबत अडी न ठेवता संवाद साधला. तसेच दोन्ही नेत्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.