उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका घरात सुरु असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या घरात सर्व धक्कादायक प्रकार सुरू होता. या महिला अधिकाऱ्याने महिना १५ हजार रुपयांना भाड्याने दिलं होतं. भाड्याने घरात राहणार्या या व्यक्तीने त्याचा चुकीचा वापर केला. त्याने घरात थेट देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला. अखेर व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी महिला आयएएसच्या अधिकाऱ्याच्या घरात धाड मारल्यानंतर पोलिसांना चार तरुणी आणि ५ तरुणांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कारवाईनंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. महिला आयएएस अधिकाऱ्याच्या घरात दररोज तरुण आणि तरुणींची येजा व्हायची. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना तक्रार दिली होती. या घराची मालक आयएएस अधिकारी दुसर्या ठिकाणी राहते.शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी दुपारी या घरात धाड टाकली. त्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. पोलीस मोठ्या संख्येने आल्याने घटनास्थळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने पोहोचले. पोलिसांनी ४ तरुणी आणि ५ तरुणींना नको त्या अवस्थेत पकडले. पोलिसांच्या कारवाईनंतर स्थानिक नागरिक एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. दोन तरुणी प्रयागराज, एक वाराणसी आणि एक पश्चिम बंगालची आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पुरावे मिळत जाईल, त्यानंतर आणखी कडक कारवाई केली जाईल. पोलिस या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. संपूर्ण कारवाईनंतर या प्रकरणाची माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या घरात गेल्या तीन महिन्यांपासून देहविक्रीचा प्रकार सुरु होता. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केलीये. सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे'.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.