Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता 'वीज' WiFi सारखीच मिळणार; घरांत तारांशिवाय लाईट येणार, वायरलेस वीज कशी असेल जाणून घ्या

आता 'वीज' WiFi सारखीच मिळणार; घरांत तारांशिवाय लाईट येणार, वायरलेस वीज कशी असेल जाणून घ्या

आपल्याकडे वीज तारांद्वारे मिळते. तारांशिवाय वीज येत नाही. तारांमधूनच वीज एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते. पण, आता यामध्ये मोठा बदल होणार आहे. कारण आता वीज तारांशिवाय, म्हणजेच वायरलेस पद्धतीने आपल्याला घरात मिळणार आहे.

सध्या, आपल्याकडे जसा मोबाईल फोनवर कॉल येतो, इंटरनेट चालते किंवा मोबाइल वायरलेस चार्ज होतो, त्याच पद्धतीने वीजही हवेतून पोहोचवता येईल, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. हे ऐकायला जरी अवघड वाटत असले तरी, फिनलँड देशाने हे प्रत्यक्षात करून दाखवले आहे.

फिनलँडमध्ये वायरलेस पॉवर ट्रान्सफरवर वेगाने संशोधन सुरू आहे. केबल, प्लग किंवा सॉकेटशिवाय वीज पाठवता यावी, असे शास्त्रज्ञांचे उद्दिष्ट आहे. यासाठी आल्टो विद्यापीठ, हेलसिंकी विद्यापीठ आणि औलू विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जात आहे.

२०२५-२६ दरम्यान, या क्षेत्रात महत्त्वाचे यश मिळाले. ध्वनीतरंग, रेडिओ फ्रिक्वेन्सी, लेझर आणि मॅग्नेटिक फील्ड्स यांच्या मदतीने हवेतून वीज पाठवण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

वायरलेस चार्जिंगमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा वापर होतो. एका बाजूने ऊर्जा पाठवली जाते आणि दुसऱ्या बाजूने ती ऊर्जा घेतली जाते. फिनलँडमधील संशोधनामुळे आता डिव्हाइस अचूक ठिकाणी ठेवण्याची गरज नाही. हलत असतानाही डिव्हाइस चार्ज होऊ शकते.

लॅबच्या बाहेरही हे तंत्रज्ञान यशस्वी ठरत आहे. छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रोबोट्स आणि सेन्सर्स हवेतून वीज घेताना दाखवण्यात आले आहेत. काही प्रयोगांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यक्षमता मिळाली आहे. २०२५ मध्ये टाईम मॅगझीनने फिनलँडच्या या तंत्रज्ञानाला सर्वोत्तम शोधांमध्ये स्थान दिले.

तरीही अजून घरांमध्ये पूर्णपणे वायरलेस वीज पोहोचायला वेळ लागणार आहे. सध्या हे तंत्रज्ञान कमी अंतर आणि कमी वीज क्षमतेसाठी अधिक उपयुक्त आहे. मोठ्या अंतरासाठी आणि जास्त वीज वापरासाठी अजून संशोधनाची गरज आहे. मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास सुरू आहे.

तज्ञांच्या मते, घरांमध्ये, गाड्यांमध्ये आणि संपूर्ण शहरांमध्ये वायरलेस वीज पोहोचण्यासाठी अजून काही वर्षे लागणार आहेत. पण भविष्यात तारांशिवाय वीज ही गोष्ट नक्कीच वास्तवात येऊ शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.