महाराष्ट्र हादरला! बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; तर 10 ते 12 गंभीर जखमी
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगाव ,सुसर्दा, शिवाझीरी नारदु या रस्त्याने प्रवास करत असलेल्या पिकअपचा भीषण अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पिकअप पन्नास फूट दरीत कोसळून उलटल्याची घटना
घडली आहे. अपघातात पिकअपमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित
दहा ते बारा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचाराकरिता रुग्णवाहिकेने धारणी
उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणीगाव
गावालगत असलेल्या कंजोली गावातील नागरिक रविवारी मध्य प्रदेशातील देडतलई
येथील आठवडी बाजाराकरिता गेले होते. राणीगावाील मजूर हे राणीगाव, शिवाझीरी,
सुसरदा, नारदु,झिल्पी मार्गे मध्य प्रदेशातील देडतालई येथे आठवडी
बाजाराकरिता गेल्याची माहिती हाती आली आहे. या पिकअप वाहनाने 15 ते 20 जण
गेले होते.
अपघात नेमका कशामुळे घडला?
मध्य प्रदेशच्या गावातील बाजार आटोपून घरी येत असताना सायंकाळी सहा वाजताच्या पिकअप वाहन राणी गाव ते शिवाझिरी घाट वळणाच्या रस्त्यादरम्यान घोडादेव बाबाजवळ असलेल्या धामण या ठिकाणी रस्त्यावर खड्डे असल्यामुळे पिकअप वाहन 50 फूट खोल दरीत उलटलं. पिकअप उलटल्याने कंजोली येथील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित दहा ते बारा जण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवलेत असल्याची माहिती हाती आली आहे. पिकअप अपघातातील सर्व जखमींवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. तत्पूर्वी, पिअकपमध्ये नेमकं किती जण होते, मृत्यू पावलेल्या मजुरांची नावे काय आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मृतांमध्ये महिलांचा समावेश होता का, याची माहिती समोर आलेली नाही. परंतु राज्यातील वाढत्या अपघातामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.