Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा करिष्मा, कडेगावात 100 टक्के स्ट्राईक रेट! भाजपचा व्हाईट वॉश

सांगलीत काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा करिष्मा, कडेगावात 100 टक्के स्ट्राईक रेट! भाजपचा व्हाईट वॉश


कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मागील निवडणुकीत भाजपने येथे 3 जागा जिंकून वर्चस्व मिळवले होते, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

मात्र, यावेळी काँग्रेसने पूर्ण ताकदीने पुनरागमन करण्यासाठी मोर्चेबांधणी केली असून, दोन्ही पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यात विजयाचा दावा केला होता. अशातच काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून 100 टक्के यश काँग्रेसला मिळालंय.
विश्वजीत कदमांचा करिष्मा


कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचा करिष्मा पहायला मिळाला आहे. कडेगाव तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. तर कडेगाव पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी तर केवळ एका जागेवर भाजपचा विजय झालाय. कडेगाव पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे.

चिंचणी गणात देखील असाच चुरशीचा सामना पाहायला मिळत असून, तिथे आमदार विश्वजीत कदम यांचे पुतणे दिग्विजय शांताराम कदम काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात भाजपने कुलदीप सर्जेराव औताडे यांना उतरवून मोठे आव्हान उभे केले आहे. कडेगाव आणि देवराष्ट्रे यांसारख्या प्रतिष्ठेच्या गटांमध्ये देखील 'काटे की टक्कर' असल्याने विजयाचे अंतर खूपच कमी राहण्याची शक्यता होती.

आज सकाळी 10 वाजल्यापासून कडेगाव येथे मतमोजणीला सुरुवात झाली असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व 4 गटांचे आणि 8 गणांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. कडेगावचा हा निकाल केवळ तालुक्यापुरता मर्यादित नसून, जिल्ह्याच्या सत्तेच्या समीकरणात भाजप आपली पकड कायम ठेवणार की काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारणार, हे आता लवकरच समोर येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.