Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत अनोळखी व्यक्तींनी तब्बल 100 खड्ड्यांत ठेवल्या चिठ्ठ्या; असं काय लिहिलंय चिठ्ठीत?

सांगलीत अनोळखी व्यक्तींनी तब्बल 100 खड्ड्यांत ठेवल्या चिठ्ठ्या; असं काय लिहिलंय चिठ्ठीत?
 

सांगली : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे सिद्धिविनायकपूरम् ते विश्रामबागच्या गणपती मंदिर चौक दरम्यानच्या रस्त्यावर काल सकाळीच अनोळखींनी शंभरावर खड्ड्यात  या चिठ्ठ्या ठेवल्या आहेत. उपहासात्मक आणि अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची परिसरात चर्चा आहे. रस्त्यातील खड्डे जीवघेणे ठरल्याचे अनेक उदाहरणे आहेत. खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सहज पुढाकार घेत नाही. एकीकडे गुळगुळीत रस्त्यावर वारंवार डांबर फासले जाते.  
 
दुसरीकडे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे, पादचारी, वाहनधारकांचा जीव गेला, तरी त्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. या परिस्थितीत, अनोळखी नागरिकांनी खड्ड्यांमध्ये चिठ्ठ्या ठेवून आंदोलन केले आहे. प्रिंट केलेला उपहासात्मक मजकूराचा कागद विश्रामबाग येथील गणपती मंदिर रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात ठेवला आहे.
 
काय आहे चिठ्ठीत..?
'या खड्ड्यांतून विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी रस्ता दाखवा. या खड्ड्यातून भक्तांना मंदिरात जाण्यासाठी रस्ता दाखवा. या खड्ड्यातून वयस्करांना बाजारात जाण्यासाठी रस्ता दाखवा. या खड्ड्यातून नोकर-व्यावसायिकांना गाडीने जाण्यासाठी रस्ता दाखवा. याच खड्ड्यांतून नगरसेवक मते मागायला.. आमदार पाहुण्यांना भेटायला.. पालकमंत्री उद्‍घाटन करायला.. किंगमेकर प्याद्यांना भेटायला.. रस्ता समजून फिरला असाल, तर आम्हा प्रभागातील नागरिकांना, पण खराखुरा डांबरी रस्ता दाखवा,' असा मजकूर लिहिलेले प्रिंटेड कागद खड्ड्यांमध्ये ठेवले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.