लंडन : ब्रिटिश राजघराण्याला हादरवून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. किंग चार्ल्स यांचे धाकटे बंधू आणि ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्य्रू यांना अटक करण्यात आली आहे. 'एपस्टीन फाईल्स' मधील धक्कादायक खुलाशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
अँड्य्रू यांच्यावर सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे आज अँड्र्यू यांचा ६६ वा वाढदिवस होता. अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक झाल्यापासून प्रिन्स अँड्य्रू यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या फाईल्समध्ये प्रिन्स अँड्य्रू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर त्यांच्याकडून आधीच सर्व लष्करी पदव्या आणि राजघराण्यातील मानमरातब काढून घेण्यात आले होते. मात्र, आता त्यांना थेट अटक झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.
राजघराण्याची प्रतिमा पणाला:
किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानंतर राजघराण्यासमोर आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट मानले जात आहे. या अटकेमुळे केवळ ब्रिटनमध्येच नाही, तर संपूर्ण जगात ब्रिटिश राजघराण्याच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 'पब्लिक ऑफिसचा गैरवापर' केल्याचा ठपका ठेवत लंडन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
एपस्टीन फाईल्सचा विळखा
जेफ्री एपस्टीन याने २०१९ मध्ये तुरुंगात आत्महत्या केल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक बड्या हस्तींची नावे समोर येत आहेत. यात बिल गेट्स यांच्यानंतर आता थेट ब्रिटिश राजपुत्राला अटक झाल्याने, येत्या काळात अजून अनेक मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सहा ते आठ वर्षांच्या एका चिमुरडीला इलेक्ट्रिक शॉक देऊन तिचा छळ केला जात असताना अँड्र्यू तिथे उपस्थित होते आणि ते हे सर्व मूकप्रेक्षक म्हणून पाहत होते, असा धक्कादायक दावा या फाईल्समध्ये करण्यात आला आहे. ९० च्या दशकात विंडसरमधील 'फ्रॉगमोअर कॉटेज' येथे ही घटना घडली होती. गिसलेन मॅक्सवेल हिने एका मुलीला टेबलावर बांधून तिला इलेक्ट्रिक शॉक दिले होते. यावेळी अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर आणि इतर काही पुरुष तिथे उपस्थित राहून हा छळ पाहत होते, असा आरोप या अहवालात आहे. याच प्रकरणातून ही अटक झाल्याचे समजते आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.