Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजना संवाद सत्राचे आयोजन !

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजना संवाद सत्राचे आयोजन !
 

आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, विकसित भारत या सारख्या अभियानाच्या उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री कार्यालय ( GMO ) सांगली यांच्या द्वारे, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)  व जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्या सहयोगाने  शासकीय योजना - संवाद सत्राचे आयोजन  
मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६, 
रोजी, 
दुपारी ४ वाजता
 खरे मंगल कार्यालय विश्रामबाग सांगली येथे केले आहे. 

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सौ.विद्या कुलकर्णी, महाव्यवस्थापक - जिल्हा उद्योग केंद्र सांगली, शैलेंद्र जहागीरदार, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), सांगली, माधव कुलकर्णी स्वावलंबी भारत अभियान, भूपाल सुल्ल्यान हे असणार आहेत.  सागंली जिल्ह्यातील युवकांसाठी, बचत गटांच्या महिलांना अथवा शेतकरी यांच्यासाठी, स्वयंरोजगार,  व्यवसाय कर्ज योजना माहिती आधारित शासकीय योजनांची माहिती, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत येणाऱ्या  इन्क्युबेशन योजना, अमृत MPSC, UPSC च्या विद्यार्थ्याना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना, अमृत - ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना, अमृत पेठ इ-कॉमर्स सूक्ष्म उद्योजक, अमृत मोबाइल फिल्म मेकिंग, अमृत ॲनिमेश, अमृत सूर्य मित्र- सोलार इंस्टॉलेशन टेक्निशियन, अमृत अलंकार- इमिटेशन ज्वेलरी मेकर, अमृत ग्लॅमर- प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, अमृत अन्नपूर्णा, अमृत बेकरी (क्राफ्ट बेकर), अमृत डिजीप्रेनुअर – डिजिटल आणि सेल्स मार्केटिंग एक्झिक्युटिव, अमृत पेठ थेट बाजार व्यवस्थापन, अमृत बायो एनजाईम, अमृत फ्रेंचाइसी विक्री आणि व्यवसाय विकास, अमृत आरी वर्क, अमृत उद्योग कौशल्य वर्धन (लघु प्रशिक्षण ), अमृत फॅशन डिसायनिंग, अमृत पर्यटन – टुरिजम कन्सलटंट, अमृत ई-रिपैअर मित्र, अमृत महाराष्ट्र समुदाय पत्रकार, अमृत जागतीक व्यापार (इम्पोर्ट- एक्सपोर्ट एक्झिक्युटिव), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व इतर शासकीय  योजनांची माहिती देण्यात येणार आहे.  वरील योजनांवर शिबीर दरम्यान अर्ज करण्यासाठी सोबत येतांना, आधार कार्ड, PAN Card, आपला फोटो शिक्षण प्रमाण पत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणावा असे आवहान संयोजक समिती द्वारे करण्यात आले आहे.  कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क पालकमंत्री कार्यालय ( GMO ) 7498916421 अथवा महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत ) सांगली  9112228766 येथे फोन करून आपली नाव नोंदणी करावी.

*कृपया प्रसिद्धीसाठी*


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.