Breaking News! महाराष्ट्राच्या पोलिस खात्यात खळबळ! पोलिस कर्मचाऱ्याने तब्बल 14 लाखांची लाच घेतली; छत्रपती संभाजीनगरचा व्हिडिओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगरमधील एक व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. एक पोलीस कर्मचारी 14 लाखांची लाच घेताना व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ व्हायर झाल्यावर पोलिस खात्याने या प्रकरणाची गांभीर्याने
दखल घेतली. या प्रकरणी संबधीत पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात
आली आहे. संभाजीनगरच्या लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनवर कारवाई
करू नयेत यासाठी एका पोलीस निरिक्षकाने आपल्या रायटरच्या माध्यमातून लाच
घेतल्याचा देखील दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 14 लाख रुपये
मोजून घेताना दिसत आहे, आणि हा व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा दावा केला
जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम घेतली जात
असल्याच्या दाव्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर, या सर्व घटनेवर पोलिसांची देखील
प्रतिक्रिया आली आहे, व्हिडिओ दिसणाऱ्या पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात
आला आहे. तसेच ज्या पोलीस निरीक्षकावर आरोप करण्यात आले त्यांची पोलीस
मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातच लाच घेतली
दरम्यान, मंत्रालयात लाचखोरीचं मोठं प्रकरण उघडकीस आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला काल एसीबीने अटक केलीय..मंत्रालयाच्या दुस-या मजल्यावरील मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचत लिपिक राजेंद्र ढेरंगेला 35 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केलीय... मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी त्याने एका नागरिकाकडे लाच मागितली होती.एसीबी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र ढेरंगे याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. पडताळणीत ढेरंगेने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी सायंकाळी 6 वाजता सापळा रचण्यात आला आहे. तडजोडीअंती ढेरंगे तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये घेण्यास तयार झाला. अखेर, ३५ हजाराची लाच घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.