जबड्याखाली आलेली एक लहानशी गाठ इतकं मोठं संकट उभं करेल, असं अँथनी पेरियम यांच्या स्वप्नातही कधी आलं नव्हतं. ती गाठ जाणवताच त्यांनी दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घेतली. तपासण्या झाल्या आणि काही दिवसांतच एक धक्कादायक सत्य समोर आलं. अँथनी यांना डोक्याचा आणि मानेचा कॅन्सर झाला होता. अँथनी यांच्या जिभेच्या मुळाशी अखेर एक गाठ (ट्युमर) सापडली. हा कॅन्सर HPV नावाच्या एका व्हायरसमुळे झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
त्या एका गाठीमुळेच त्यांच्यावर आपली जीभ गमावण्याची वेळ आली. HPV हा एक अतिशय सामान्य व्हायरस आहे, जो त्वचेवर परिणाम करतो. सहसा यामुळे कोणालाही त्रास होत नाही. पण यातील काही प्रकार धोक्याचे असू शकतात, ज्यामुळे शरीरावर चामखीळ येऊ शकतात किंवा पुढे जाऊन कॅन्सरही होऊ शकतो. कार्डिफमध्ये राहणारे अँथनी सांगतात, "मी आतापर्यंत फक्त एवढंच ऐकलं होतं की, HPV मुळे फक्त स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर होतो. पण पुरुषांमध्येही यामुळे अशा प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो, याची मला साधी कल्पनाही नव्हती." अँथनी सांगतात की, "मी स्वतःला नशीबवान समजतो की मी अजूनही बोलू शकतो आणि जेवू शकतो. पण जर मी डॉक्टरांकडे जायला थोडा जरी उशीर केला असता, तर कदाचित मला माझी जीभ गमवावी लागली असती किंवा माझा जीवही गेला असता."
NHS वेल्स (आरोग्य संस्था) काय सांगते?
बहुतेक
लोकांच्या शरीरात जेव्हा HPV चा संसर्ग होतो, तेव्हा शरीर स्वतःहून तो
व्हायरस बाहेर काढते. पण काही वेळेस यामुळे गुप्तांगावर चामखीळ येऊ शकतात
किंवा त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकते. पुरुषांमध्ये प्रामुख्याने
डोक्याचा आणि मानेचा, तर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर यामुळे
होऊ शकतो. आरोग्य विभागातर्फे 12 ते 13 वर्षांच्या मुलांना ही लस घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून भविष्यात हा धोका टाळता येईल अँथनी यांनी त्यांच्या या अनुभवातून महत्त्वाचा सल्ला दिला की, "जर
तुम्हाला शरीरावर कुठेही गाठ जाणवली, मग ती दुखत नसली तरीही, लगेच
डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. या प्रकारच्या कॅन्सरबद्दल फारसं बोललं
जात नाही, मुख्य करून पुरुषांमध्ये. पण वेळीच पाऊल उचललं तर नक्कीच जीव
वाचू शकतो."
अँथनी यांना कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती, तरीही मार्च 2023 मध्ये करण्यात आलेल्या स्कॅन आणि बायोप्सीमध्ये त्यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले. 41 वर्षांचे अँथनी सांगतात, "त्यावेळी माझी मुले खूप लहान होती. एक 3 वर्षांचे आणि दुसरे 6 वर्षांचे. कॅन्सर झाल्याचे कळल्यावर मला स्वतःपेक्षा त्यांची काळजी वाटली. त्यांच्या भविष्याचा विचार करून मी पूर्णपणे हादरून गेलो होतो." डॉक्टरांनी अँथनी यांच्या मानेतील 44 गाठी काढल्या. जिभेच्या मुळाशी असलेली कॅन्सरची मुख्य गाठ शोधण्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागली.अँथनी म्हणतात, "डॉक्टरांनी मला सांगितले की आपण अगदी योग्य वेळी हा आजार पकडला. मानेतील एक गाठ फुटण्याच्या बेतात होती. जर अजून उशीर झाला असता, तर हा कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला असता." Perriamकॅन्सर नक्की आहे की नाही, हे तपासण्यासाठी अँथनी यांची सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचणी करण्यात आली. रेडिओथेरपी आणि केमोथेरपीचे उपचार खूपच त्रासदायक होते. आणि या काळात अँथनी यांचे वजन 22 किलोने कमी झाले.
ते
सांगतात, "माझ्या तोंडातील लाळ पूर्णपणे सुकली होती. साधं पाणी पिणंही
कठीण झालं होतं, कारण तोंडात जे काही टाकायचो त्याची पावडर व्हायची. मी
इतका अशक्त झालो होतो की शेवटी मला व्हीलचेअर वापरावी लागली." अँथनी
पुढे म्हणतात, "व्हीलचेअरवरून हॉस्पिटलच्या त्या कॉरिडॉरमधून उपचारांसाठी
जाणं माझ्या मनावर खूप ताण आणत होतं. पण माझ्या कुटुंबासाठी मला हे सगळं
सहन करण्याची ताकद मिळाली. मला माझा 40 वा वाढदिवस बघायचा होता, त्यासाठी
मला जगायचं होतं."
HPV नक्की काय आहे?
HPV हा त्वचेवर परिणाम करणारा एक व्हायरस आहे आणि त्याचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत. हा व्हायरस शारीरिक संबंधातून किंवा त्वचेचा त्वचेशी संबंध आल्यामुळे पसरतो. वेल्समध्ये 12 ते 13 वयोगटातील लहान मुलांना ही लस दिली जाते कारण या वयात ती सर्वात जास्त प्रभावी ठरते. युनिव्हर्सिटी हॉस्पिटल वेल्सच्या सांगण्यानुसार 2008 पासून ही लस द्यायला सुरुवात केल्यामुळे 20 ते 30 वयोगटातील महिलांमधील गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण 90% ने कमी झाले आहे.डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून अँथनी यांच्या मानेतील 44 गाठी बाहेर काढल्या. कार्डिफमधील तज्ज्ञ डॉक्टर संदीप बेरी यांनी पालकांना विनंती केली आहे की, त्यांनी आपल्या मुलांचे लसीकरण नक्की करून घ्यावे. ते म्हणतात की, HPV लस अनेक वर्षांपासून जगभरात वापरली जात आहे. ही पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. मुला-मुलींना निरोगी ठेवण्यासाठी आणि भविष्यातील कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ही लस अत्यंत महत्त्वाची आहे. मुले साधारण 8 वीत म्हणजे 12-13 वर्षांचे असताना ही लस दिली जाते. याचे कारण म्हणजे, या वयात मुलांची रोगप्रतिकारक शक्ती या लसीला सर्वात जास्त प्रतिसाद देते. मुख्य म्हणजे भविष्यातील शारीरिक संबंध सुरू होण्यापूर्वी ही लस दिल्यास ती जास्त प्रभावी ठरते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.