Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून वर्षभरात 20 लाखांहून अधिक निधी मंजूर

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून वर्षभरात 20 लाखांहून अधिक निधी मंजूर
 

सांगली विधानसभा मतदारसंघात आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकाराने कार्यरत असलेल्या 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा'मार्फत मागील एक वर्षात तब्बल 20 लाख रुपयांहून अधिक निधी गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी मंजूर करण्यात आला आहे. वाढत्या उपचार खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही मदत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे.

गंभीर आजारांसाठी मोठे आर्थिक बळ देत सांगली विधानसभा क्षेत्रातील हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड विकार, तसेच अपघात व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना या माध्यमातून तातडीने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. अनेक कुटुंबे उपचार खर्चाच्या ओझ्याखाली दबली जात असताना, या कक्षामार्फत मिळालेल्या निधीमुळे त्यांना मोठा आधार मिळाला. काही प्रकरणांमध्ये तातडीची शस्त्रक्रिया आणि दीर्घकालीन उपचार शक्य झाले, ज्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. 
पारदर्शक आणि जलद कार्यप्रणाली मुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता केंद्रामध्ये अर्ज भरण्यापासून ते निधी मंजुरीपर्यंत सर्व प्रक्रियेत रुग्णांना मोफत मार्गदर्शन केले जाते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, शासकीय योजनांची माहिती, संबंधित रुग्णालयांशी समन्वय आणि प्रस्ताव सादरीकरणाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे निधी मंजुरीचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
 
या महत्त्वपूर्ण कार्यात मुंबई येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सांगलीतील कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तथा कक्ष प्रमुख डॉ. मनीषा सुरेश वाघ, लिपिक  अधिराज कुलकर्णी, आमदार गाडगीळ यांचे स्वीय सहाय्यक  अमोल कणसे, सोनाली गवळी, श्रीधर जाधव, आबासाहेब जाधव तसेच भाजपा आयटी सेल प्रभारी शुभम कुलकर्णी यांच्या सक्रिय सहभागामुळे हा निधी गरजूंपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.
*आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे प्रतिपादन* *"गरजू रुग्णांना वेळेत आणि योग्य ती मदत मिळणे हीच आमची प्राथमिकता आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्या साठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. माझ्या जनसंपर्क कार्यालयामार्फत प्रत्येक पात्र नागरिकाला सर्वतोपरी मदत केली जात आहे."* 
 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.