थलापथी विजयचा 25 वर्षांचा संसार मोडणार; पत्नी संगीताने केले गंभीर आरोप, 'या' दिवशी होणार सुनावणी
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे प्रमुख विजय सध्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या पत्नी संगीता सोर्नलिंगम यांनी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अधिकृत अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जामध्ये वैवाहिक मतभेद आणि दीर्घकाळ चाललेला दुरावा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. विजय आणि संगीता गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत असल्याचेही समजते. त्यामुळे हा निर्णय अचानक नसून, बराच काळ विचारांती घेतल्याचे बोलले जात आहे. काही वृत्तांनुसार, विजयचे एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही अर्जात करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही.
न्यायालयीन प्रक्रिया :
या
प्रकरणाची पहिली सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. कौटुंबिक न्यायालयात
सुरुवातीला समेटाचा प्रयत्न केला जातो. जर तो यशस्वी झाला नाही, तर प्रकरण
पुढे घटस्फोटाच्या प्रक्रियेकडे जाईल. त्यामुळे पुढील काही आठवडे या
खटल्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
विजय-संगीता यांचे नाते
विजय
आणि संगीता यांचा विवाह १९९९ मध्ये झाला. संगीता या मूळच्या श्रीलंकन तमिळ
असून, त्या विजयच्या चाहत्या होत्या. या दांपत्याला दोन मुले आहेत जेसन
संजय आणि दिव्या साशा. विजय
यांनी आपल्या कारकिर्दीत 'घिली', 'मर्सल', 'बीस्ट', 'लिओ'सारख्या अनेक
यशस्वी चित्रपटांद्वारे लोकप्रियता मिळवली आहे. अलीकडे त्यांनी राजकारणात
सक्रिय प्रवेश करून TVK पक्षाची स्थापना केली आहे.
सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम?
'आदर्श कुटुंबवत्सल' अशी प्रतिमा असलेल्या विजय यांच्याबाबत या घडामोडींचा त्यांच्या सार्वजनिक आणि राजकीय प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी अधिकृत निवेदन येणे बाकी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.