Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खूशखबर! रेल्वेत 22 हजार पदांची 'मेगाभरती! उमेदवाराला 2 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

खूशखबर! रेल्वेत 22 हजार पदांची 'मेगाभरती! उमेदवाराला 2 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
 
 
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी) अंतर्गत भारतीय रेल्वेत तब्बल 22 हजार 195 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या हजारो पदांच्या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. आरआरबीअंतर्गत ग्रुप डीअंतर्गत असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रकमन आणि ट्रकमेंटेनर अशी एकूण 22 हजार 195 पदे भरली जाणार आहेत.

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अखेरची तारीख 2 मार्च 2026 पर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 10 वी उत्तीर्ण किंवा आयटीआय पास असायला हवा. उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे असायला हवे. एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट असून ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे. सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज भरण्यासाठी 500 रुपये फी, तर एससी, एसटी, ईबीसी, महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी 250 रुपये ठेवण्यात आली आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://indianrailways.gov.in वर देण्यात आली आहे.
 
एसबीआयमध्ये 2273 पदांची भरती
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर्स (सीबीओ) पदांच्या एकूण 2 हजार 273 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी असून मार्च 2026 मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज करणाऱया उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि बँकेतील दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे, तर जास्तीत जास्त 30 वर्षे असायला हवे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://ibpsreg.ibps.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवाराला पाच वर्षे सूट आणि ओबीसी वर्गातील उमेदवाराला तीन वर्षांची सूट मिळणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवाराला 750 रुपये फी भरावी लागणार असून एससी, एसटीसाठी कोणतीही फी नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.