Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रशासनात मोठा बदल! मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकाच वेळी 4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;पाहा संपूर्ण यादी

प्रशासनात मोठा बदल! मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकाच वेळी 4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;पाहा संपूर्ण यादी
 

मुंबई: महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर खांदेपालट सुरू झाली असून, सोमवारी राज्यातील 4 ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या आदेशानुसार हे निर्णय घेण्यात आले असून, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली बदल्यांची मालिका या आठवड्यातही कायम राहिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर प्रशासनात नियमितपणे बदल्या केल्या जात आहेत. साधारणपणे प्रत्येक 10 ते 15 दिवसांनी 8 ते 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याने, प्रशासनात स्थिरतेपेक्षा कार्यक्षमतेला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे संकेत मिळतात. या पार्श्वभूमीवर सोमवारी जाहीर झालेल्या बदल्यांकडे महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णयांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे.
या आदेशानुसार श्रीधर दुबे (IAS, SCS 2014), जे आतापर्यंत महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक होते, त्यांची आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सत्यजित बडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांची अपंग व्यक्तींसाठी आयुक्त, पुणे म्हणून बदली करण्यात आली आहे. 
 
डॉ. सुनील भोकरे (Non-SCS) यांची महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई येथील प्रकल्प संचालक (शहरी आरोग्य) पदावरून आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राहुल कुलकर्णी (Non-SCS), गृह विभागातील सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याआधीच शुक्रवारी सायंकाळी आणखी दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. मनिषा म्हैसकर पाटणकर यांची बदली अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. डॉ. आय. एस. चहल यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सततच्या बदल्यांमुळे प्रशासनात नवे चेहरे, नवी जबाबदारी आणि नव्या कार्यपद्धती आकाराला येत असल्याचे चित्र आहे. या बदल्यांचा थेट परिणाम राज्यातील अन्न सुरक्षा, आरोग्य, सामाजिक न्याय आणि सहकार क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेवर होणार असून, येत्या काळात त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसून येणार आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.