Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१८ रुपयांच्या सिगारेटसाठी आता मोजावे लागणार ७० रुपये? सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किंमतीत वाढ

१८ रुपयांच्या सिगारेटसाठी आता मोजावे लागणार ७० रुपये? सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किंमतीत वाढ
 

तुम्हीही जर सिगारेट किंवा पान मसाला असे तंबाखूजन्य पदार्थ खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आजपासून तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यावर सरकारने कर वाढवला आहे. त्यामुळे तुमच्या खिशाला फटका बसणार आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात तथाकथित 'हानिकारक वस्तूं'वरील करप्रणालीत सरकारने मोठा बदल केला आहे. बदललेल्या करप्रणालीमुळे १ फेब्रुवारी २०२६ सिगारेट, तंबाखू उत्पादने आणि पान मसाला महाग झाले आहेत. नवीन प्रणालीत सध्याच्या जीएसटी व्यतिरिक्त, अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि आरोग्य व राष्ट्रीय सुरक्षा उपकर लागू करण्यात आला आहे. हानिकारक उत्पादनांच्या वापरापासून नागरिकांना परावृत्त करणे हा या मागील उद्देश असल्याचे सांगितले जाते.

सिगारेट ७० ते ७२ रुपये होणार?
प्रति १००० सिगारेट उत्पादन शुल्क दर आता २,०५० ते ८,५०० पर्यंत जाणार आहे. काही सिगारेटवर कर ११,००० रुपयांपर्यंत पोहचू शकतो. हा दर सिगारेटची लांबी आणि श्रेणींवर अवलंबून आहे. याचसोबत सिगारेटवर आदीच लादलेला ४० टक्के जीएसटी तसाच राहिल. त्यामुळे एकूण दर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो.

नवीन करप्रणालीमुळे कधीकाळी १८ रुपयांना मिळणारे सिगारेट आता ७०-७२ रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तंबाखू, गुटखा, जर्दा, खैनी आणि तत्सम उत्पादनांसाठी फॅक्टरी-खर्च-आधारित मूल्यांकनाच्या जागी एमआरपी-आधारित जीएसटी मूल्यांकन प्रणाली लागू करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर कायद्यांतर्गत नवीन नोंदणी अनिवार्य केली आहे. 
तंबाखूजन्य पदार्थ महागणार

नवीन उत्पादन शुल्काचा परिणाम फक्त सिगारेटवर नाही तर तंबाखूजन्य पदार्थांवरही होणार आहे. कच्च्या तंबाखूवर ६० ते ७० टक्के कर आकारला जाईल. निकोटीन संबंधित उत्पादनांवर १०० टक्के कर लागू होतो. तसेच पान मसाला, गुटखा या पदार्थांवर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लादला जातो. यामुळे सर्वच तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.