Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking ! ईडीकडून अनिल अंबानी यांचं घर जप्त, मोठी कारवाई

Big Breaking ! ईडीकडून अनिल अंबानी यांचं घर जप्त, मोठी कारवाई
 

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील 'Abode' निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या या घराची किंमत अंदाजे 3,716 कोटी रुपये एवढी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्तीची आहे. दरम्यान ईडीने कारवाई करण्यापूर्वी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं देखील त्यांना मोठा धक्का दिला होता. उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाशी संबंधित एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाचा अंतरिम आदेश रद्द करण्यात आला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना फसवे म्हणून वर्गीकृत करण्याच्या कारवाईला एक न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्थगिती दिली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईडीकडून ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. या संदर्भात पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ईडीकडून या प्रकरणात तात्पुरत्या स्वरुपात जप्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) शी संबंधित एका कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणाशी निगडीत आहे.  अनिल अंबानी यांच्या ज्या निवासस्थानावर ईडीकडून कारवाई करण्यात आली ती आलिशान इमारत मुंबईतील पाली हिल परिसरामध्ये आहे.'Abode' असं या इमारतीचं नाव असून, ही एकूण 17 मजल्यांची इमारत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्तीची आहे. दरम्यान ही कारवाई जरी ईडीकडून तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली असली तरी देखील यामुळे आता अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी यांची आता दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी पीएमएलए अंतर्गत त्यांचा जबाव नोंदवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे. 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.