Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking ! तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडे? मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय, वाचा

Big Breaking ! तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडे? मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय, वाचा
 

दिवंगत अजित पवार यांच्याकडील अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राने दिली आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ खात्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच औकाफ ही खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली. पण अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे ठेवले होते. अर्थसंकल्प मांडल्यानंतर या खात्याचा कारभार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ ते ३ महिन्यात अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाईल.

अजितदादा यांच्याकडे अर्थखात्याचा कारभार होता. त्यांनी आतापर्यंत ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या अकाली निधनानंतर या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवावी, असा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेअंतीच ठरलं होतं. पण आता पुन्हा हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितलेय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.