Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करतानावाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावे :,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे

सांगली :-आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावे :,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे
 

आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद

सांगली :  मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १९४ (इ) नुसार रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन इत्यादि आपत्कालिन वाहन रस्त्यावरती प्रवास करत असताना इतर वाहनांमार्फत अडथळा निर्माण होत असल्यास अशा वाहनमालक यांच्या विरुध्द 10 हजार रूपये दंडाची तरतूद आहे. तरी वाहनधारकांनी रुग्णवाहिका, अग्निशामक बंब अशा आपत्कालिन वाहनांना मार्गिका उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.


मोटार वाहन कायद्यातील या तरतुदीच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली मार्फत एका वाहनावरती कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे - दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी मोटार वाहन निरीक्षक आकाश कांबळे हे वायुवेग पथकात कामकाज करत असताना दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पुतळ्यासमोरील रस्ता येथे रात्र तपासणी दरम्यान MH ०४ GP ०६२८ हे वाहन आढळून आले. या वाहनधारकाकडे वाहनाची वैध कागदपत्रे नसल्यामुळे वाहनधारकास चलन जारी करण्यात आले. चलन जारी करत असताना वाहन रस्त्याच्या कडेला घेण्याबाबत सूचना मोटार वाहन निरीक्षकांनी देऊनही वाहनचालकाने वाहन रस्त्याच्या मध्ये आडवे उभे केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जॅम झाले. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या रुग्णवाहिकेस अडथळा निर्माण झाला व रुग्णवाहिकेस पर्यायी रस्त्याने जावे लागले. ही बाब अतिशय गंभीर असल्यामुळे मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १९४ (इ) अन्वये (Failure to Allow Free Passage to Emergency Vehicle) वाहन क्रमांक MH ०४ GP ०६२८ या वाहनावरती 10 हजार रुपये दंडात्मक कारवाई बाबत दि. १२ फेब्रुवारी 2026 रोजी आदेश पारीत करण्यात आले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 
 
शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर
 
सांगली : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामाकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मार्च 2026 महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मार्च 2026 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे – उरूण ईश्वरपूर 2 व 16 मार्च, कोकरूड 2 मार्च, विटा 4, 18 व 28 मार्च, कडेगाव 11 व 23 मार्च, पलूस 13 व 27 मार्च, आष्टा 10 व 30 मार्च, आटपाडी 17 मार्च, जत 5 व 20 मार्च, शिराळा 12 व 25 मार्च, तासगाव 9 व 24 मार्च, कवठेमहांकाळ 6 मार्च 2025.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.