अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणारा जेफ्री एपस्टीन याच्या अत्याचाराला एक भारतीय मुलगीदेखील बळी पडली होती. या मुलीला पीडित म्हणून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी तिचा शोध सुरू केला होता. अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध
केलेल्या कागदपत्रातून याबाबत माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान, नव्याने
समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या
नावाचा उल्लेख असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
13 जानेवारी 2020 रोजी पाठवण्यात आलेल्या एका ई-मेलमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांमधील संभाषण समोर आले आहे. यामध्ये भारतात असलेल्या पीडितेचा पत्ता आणि माहिती गोळा करण्यास सांगितले आहे, भारतातील अमेरिकन दूतावासाद्वारे तिच्याशी संपर्क साधता येईल, असे एका अधिकाऱ्याने त्यात म्हटले आहे. हा ई-मेल एपस्टीनच्या मृत्यूनंतरचा आहे. या ई-मेलचे शीर्षक 'एपस्टीन व्हिक्टिम्स' असे आहे. एपस्टीन फाईल्समध्ये आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, अनिल अंबानी या भारतीय नागरिकांचा उल्लेख समोर आला आहे. हरदीप पुरी यांनी 3-4 वेळा एपस्टीन याला भेटल्याचे एका पत्रकार परिषदेत मान्य केले. मात्र, ते खोटे बोलत असल्याचा आरोप करून काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एपस्टीन-बिल गेट्स संवाद
नवीन
एपस्टीन फाईल्समध्ये हर्षवर्धन यांचेही नाव आले आहे. 5 जून 2014 रोजी बिल
गेट्स आणि एपस्टीन यांच्यातील संवादात त्यांचा उल्लेख आला आहे. यात
एपस्टीनने बिल गेट्सला विचारले, की हर्षवर्धन यांच्यासोबत 17 सप्टेंबर रोजी
भारतात त्यांची भेट शक्य आहे का? याशिवाय 2 एप्रिल 2017 च्या एका
ई-मेलमध्ये भारताच्या पीआर पंपनीचे प्रमोटर दिलीप चेरियन यांचाही उल्लेख
आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.