सांगली जिल्ह्यातील आटपाडीत विभूती वाढीमध्ये भाजपचा प्रचार सुरु होता. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची गाडी सभेच्या ठिकाणी फिरत असल्याने सभेला अडथळा निर्माण झाला होता.आटपाडी मध्ये विभूती वाडी येथे माधवी महादेवी ब्रह्मानंद पडळकर या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आहेत.
त्यांच्या प्रचारासाठी सभा होणार होती. परंतु, या सभेदरम्यान लाऊड स्पीकर असलेली प्रचाराची गाडी अडथळा ठरत होती. त्यामुळे पडळकर समर्थकांनी ते वाहन हटवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर शिंदे गटाचे आणि पडळकरांचे समर्थक ऐकमेकांना भिडले. त्यावेळी पडळकर समर्थकांनी प्रचाराची गाडी फोडली,असा आरोप केला जात आहे.
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार राड्याचा प्रकार घडला आहे. आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आटपाडीतील तालुक्यातल्या विभूतवाडी येथे हा प्रकार घडला आहे.शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे. आटपाडीच्या निबंवडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणूक लढवत आहेत.
या
प्रचारा दरम्यान विभुतेवाडी येथे माधवी पडळकरांची सभा सुरू असताना शिवसेना
शिंदे गटाच्या विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली,यावेळी
पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही गटात वादविवाद
झाला.पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या
प्रचाराच्या गाडीची तोडफोड केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.