Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पार्थ पवारांना खासदार करण्याची तयारी सुरु असतानाच मोठा ट्विस्ट; पार्थ नाही तर ही व्यक्ती...; BJP कडून विरोध?

पार्थ पवारांना खासदार करण्याची तयारी सुरु असतानाच मोठा ट्विस्ट; पार्थ नाही तर ही व्यक्ती...; BJP कडून विरोध?
 

सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, आता त्यांची खासदारकीची जागा रिक्त झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवणार असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा पार्थ पवार यांच्यासाठी अनुकूल नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्याजागी त्यांची बंधू जय पवार यांच्या खासदार केलं जाण्याची शक्यता आहे.

जय पवार खासदार होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्याबाबत भाजपा अनुकूल नाही. मात्र जय पवार यांच्या नावावर सहमती आहे. त्यामुळे जय पवार यांना राज्यसभा खासदार केलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुंबईत पक्ष कार्यालयात पार्थ पवार दाखल झाले आहेत.

सुनेत्रा पवारांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही?
सुनेत्रा पवारांनी अद्याप राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. उपमुख्यमंत्रीपदानंतर आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा आणि सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा खासदारकीचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष अशी दोन पदे आहेत. कार्यकारी अध्यक्षपदावर सध्या प्रफुल्ल पटेल आहेत. काही काळ कार्यकारी अध्यक्षच पक्षाचा कारभार पहातील. 
 
सुनेत्रा पवार यांच्या गटनेतानिवडीनंतर उपमुख्यमंत्रीपद म्हणून शपथ झाली. मात्र, सुनेत्रा पवार या आता राज्यसभा खासदारकीचा तातडीनं राजीनामा देणार नाहीत. आधी बारामती पोटनिवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले जाईल. महाष्ट्राच्या विधानभवनात सदस्य झाल्यानंतरच सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील. एकाच वेळी दोन सभागृहांमध्ये सदस्य राहता येत नाही. मात्र सध्या सुनेत्रा पवार महाराष्ट्र विधीमंडळ सभागृहाच्या सदस्य नाहीत. त्यामुळे, सध्या सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेच्या खासदारही राहतील.
प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पियुष गोयल यांचा दावा

यादरम्यान प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असा दावा भाजपा नेते पियुष गोयल यांनी केला आहे. पीटीआयचे सीईओ आणि मुख्य संपादक विजय जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत, अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल विचारलं असता, केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, "आमची महायुती अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी व आमदारांनी भेटून त्यांची पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की त्या चांगले काम करतील.. मी त्यांना राज्यसभेत आणि त्यांच्या बारामती येथील मतदारसंघात लोकांना अत्यंत कौतुकास्पदपणे सेवा देताना पाहिले आहे".



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.