Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्र्यांवर एकेरी टीका,गोपीचंद पडळकरांनी शिंदेंच्या आमदाराला झाप झाप झापलं; म्हणाले...

मुख्यमंत्र्यांवर एकेरी टीका,गोपीचंद पडळकरांनी शिंदेंच्या आमदाराला झाप झाप झापलं; म्हणाले...
 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी गावात प्रचार सभेत बोलताना केलेल्या टीकेमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. बाबर यांनी माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांना एकदा जाऊन विचार सुहास बाबर कोण आहे ते, मुख्यमंत्री याचे उत्तर देतील अशी एकेरी भाषेत टीका करतानाच थेट मित्रपक्ष असलेल्या भाजपलाच आव्हान दिलं होतं. यावर आता मंत्री गिरीश महाजनांनंतर आता विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी झाप झाप झापलं आहे.
विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख केलेल्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर जोरदार शा‍ब्दिक हल्ला चढवला आहे. ते म्हणाले,तुमच्या अंगावर जे आज ब्रँडेड कपडे दिसताहेत ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच! मुख्यमंत्र्यांवर टीका करता तेही एकेरी भाषेत. राजकारणाचा अन् विजयाचा इतका अहंकार तुम्हाला आला का? असा संतप्त सवालही पडळकर यांनी बाबरांना केला. 
 
तसेच सात वर्षांपूर्वी राजकारणात आलात ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच. 2019 ला तुम्ही माणसात अन् राजकारणात आला नसतात ना, तर राजकारणात तुम्हाला कोणी ओळखलेही नसते. मुख्यमंत्री तुमच्यामुळे असल्याचे तुम्ही सांगता. सगळे पक्ष मीच चालवतो, असेही तुम्ही म्हणता. इतकी तुमची पात्रता तरी आहे का? अशा शब्दांत पडळकर यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांना खडेबोल सुनावले.
पडळकर यांनी यावेळी रावणाचं उदाहरण देत आमदार सुहास बाबर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, सत्तेचा अन् राजकारणाचा अहंकार चांगला नसतो. भल्याभल्यांना तो रसातळाला नेतो. रावणालाही असाच अहंकार झाला होता. रावणाची लंका जळून गेली. रावणाची अशी अवस्था होत असेल तर तुम्ही आम्ही कोण? टीका करताना काही भान ठेवायचं की नाही अशा शब्दांत भाजप आमदार पडखळकरांनी बाबरांवर तोंडसुख घेतले होते.
 

गिरीश महाजन काय म्हणाले होते...?

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची कानउघडणी केली होती. यावेळी त्यांनी तर थेट शिवसेना पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाबरांना समज द्यावी अशी रोखठोक भूमिकाही मांडली होती. 'बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे चुकीचे आहे. त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबर यांना समज द्यावी. त्यांची ही पहली टर्म आहे. ती शेवटची ठरू नये,' असा इशाराही महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिला होता.
गिरीश महाजन म्हणाले, 'सुहास बाबर ज्या भाषेत बोलतायत ते चुकीचं असून मला याचं आश्चर्य वाटलं की, ते मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलत आहेत. त्यांचं मीच सर्व पक्ष चालवतो, हे विधानही त्यांचे विधानही चुकीचे आहे. त्यांच्या राजकारणाची आता सुरुवात आहे. वर्षभरापूर्वी ते निवडून आले आहेत. लहान असून नवीन आहेत. त्यामुळे त्यांनी अगोदर राजकारण समजून घ्यावे.

मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, या सर्व गोष्टींबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या पक्षाचे नेते असल्याने त्यांनीही अशा प्रकारच्या वक्तव्याबाबत बाबर यांना समज द्यावी. सुहास बाबर यांनी तोलून मापून बोलायला हवं. नाहीतर पहिलीच टर्म शेवटची ठरू नये,असंही त्यांनी म्हटलं.

राज्यात महायुती सरकारमध्ये एकत्र असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद हा नेहमीच चर्चेत असतो. शिवसेनेच्या आमदारांकडून भाजपाच्या विरोधात आतापर्यंत वेगवेगळी विधाने करण्यात आली आहेत. भाजप मंत्री गणेश नाईक व मंत्री शंभूराज देसाई यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला आहे. या वादात भर म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भर टाकली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खानापूरच्या पळशीमध्ये एका जाहीर सभेतून आमदार बाबर यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देणारा वक्तव्य केलं आहे. आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून ते मुख्यमंत्री आहेत, असं ते म्हणाले आहेत. इतकंच नव्हे तर भाजपसह सगळे पक्ष आपण चालवतो, असं विधानही आमदार सुहास बाबर यांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.