Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! जळालेलं स्वेटर अन् जळालेलं ते घड्याळ.अजितदादांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांचे धक्कादायक खुलासे!

Big Breaking! जळालेलं स्वेटर अन् जळालेलं ते घड्याळ.अजितदादांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांचे धक्कादायक खुलासे!
 

नेते अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या विमान अपघातानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. विमानात पाच नव्हे तर सहा जण होते. सहावी व्यक्ती ही अजित पवार आहेत. अजित पवार अजूनही हयात आहेत, अशा अनेक चर्चा केल्या जात होत्या. या सर्व चर्चा लक्षात घेता पवार कुटुंबातील सदस्य आमदार रोहित पवार यांनी मी येत्या 10 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व खुलासे करेन असे सांगितले होते. दरम्यान, आज (10 फेब्रुवारी) रोहित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित करत अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अजिदादा आज हयात नाहीत. त्यांचा विमान अपघातच झाला होता, असे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच अजितदादा आज हयात नाहीत हे सांगताना त्यांनी अजितदादांच्या घडीचा दाखला दिला. अजितदादा यांच्या हातात असणारी घडी पाहून त्यांचा खरंच अपघात झाला, हे मला समजले, असे रोहित पवार यांनी सांगितले.

मला लोकांना एवढंच सांगायचं आहे की…
काल पिंपरी चिंचवडमध्ये माझी गाडी स्लो झाली. सिग्नल लागलं होतं. माझ्या लेफ्ट साईडला रिक्षाचालकाने माझ्याकडे येऊन 9 तारखेला तुम्ही अजितदादांबद्दल काही तरी सांगणार होता त्याचं काय झालं, असं विचारलं. मी त्याला सांगितलं ९ नाही १० तारखेला मला काय वाटतं ते सांगतो. काही लोकांनी भावनिक होऊन व्हिडीओ टाकले. दादा परत येतील असे व्हिडिओ आहे. सहा लोक विमानात होते. सहावे दादा होते. जी बॉडी सापडली ती दादाची नव्हती असं सांगितलं जात होतं. मला लोकांना एवढंच सांगायचं आहे, जे दादांना झालं नाही असं सर्वांना वाटतं, तसं नसून ही घटना झाली आहे. आज दादा आपल्यात नसले तरी विचाराने ते आपल्यासोबत आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
जळलेला स्वेटर, जळलेलं घड्याळ पाहिलं अन्…

अजितदादा यांचा विमान अपघात झाल्यातंतर रोज सहा दिवस मला वाटत होतं की मी एक घाणेरडं स्वप्न पडलं आहे. दादांचा अपघात झालाच नाही असं मला वाटतं होतं. परंतु जेव्हा दादांचा एक जळलेला स्वेटर, त्यांची चप्पल आणि दादांचे घड्याळ मी पाहिले. दादा दररोज घड्याळ घालायचे. ते घड्याळ 15 मिनिटे नेहमी पुढे असायचे. त्या घड्यााळात 9 वाजले होते. ते घड्याळ बंद पडलेले होते. ते पाहून मला समजलं की अजितदादा हयात नाहीत, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले

अजितदादांच्या प्रेमापोटी मी माहिती काढली
सर्व माहिती घेऊन मी तुम्हाला काही माहिती सांगतो. काही लोक म्हणतील ही माहिती कुठून आणली, कशी आणली. अजितदादांच्या प्रेमापोटी आम्ही ही माहिती गोळा केली आहे. आम्ही सरकारमध्ये नाही. तरीही जे जमलं ते केलं. दादा आणि साहेबांनी एकच सांगितलं प्रयत्न करत राहा. त्यामुळेच हा प्रयत्न केला आहे. लोकांना काय घडलं ते कळलं पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.