माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे गूढ आता अधिक गडद होऊ लागले आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा केवळ अपघात नसून त्यामागे मोठा घातपात असण्याची शक्यता रोहित पवार यांनी बोलून दाखवली आहे. एका बाजूला मोसादचा थरारक अँगल आणि दुसरीकडे विमानातील तांत्रिक बाबींवरून उपस्थित केलेले प्रश्न यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.
अजित पवार यांच्या प्रवासाचे नियोजन कसे बदलले?
अजित पवार यांचा मूळ प्लॅन कारने प्रवास करण्याचा होता, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मात्र आदल्या रात्री मुंबईत त्यांचा वेळ मुद्दाम जाईल असे काही घडले का, जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्यांना घाईत विमानाने प्रवास करावा लागेल, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, प्रवासाच्या ऐनवेळी विमानाचे दोन्ही पायलट का बदलण्यात आले? या बदलामागे नेमका कोणाचा हात होता, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवारांचे अपघाती निधनाबद्दल 5 मोठे प्रश्न, रोहित पवारांनी मागितली उत्तरं पायलटची भूमिका आणि तांत्रिक यंत्रणेवर संशय
विमानाचा
अपघात होत असताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही, हा प्रश्न तांत्रिक
तज्ज्ञांनाही विचार करायला लावणारा आहे. विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता
आणि पायलटने दुसरा गो अराऊंड घेण्याचा प्रयत्न का केला नाही, याकडे रोहित
पवार यांनी लक्ष वेधले आहे. इंधन वाचवण्यासाठी पायलटला काही सूचना देण्यात
आल्या होत्या का आणि कुणाच्या जिवापेक्षा इंधन वाचवणे कंपनीसाठी महत्त्वाचे
होते का, असा टोकदार प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच विमानातील स्टॉल
वॉर्निंग सिस्टिम आणि इथल्या अलर्ट यंत्रणेचा आवाज का आला नाही, हे
संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केले.
इस्त्रायलच्या मोसादचा धक्कादायक उल्लेख
रोहित पवार यांनी दिलेल्या मोसादच्या दाखल्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेवर आधारित एका पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीचा काटा काढायचा असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा, अशी मोसादच्या एका एजंटची कार्यपद्धती होती. अजित पवार यांच्या बाबतीतही पायलटकडून असाच काही प्रकार घडवून आणला गेला आहे का, याचा तपास आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायला हवा. केवळ स्थानिक संस्थाच नाही, तर फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थांकडून या प्रकरणाचे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्ब? 50 कोटींचा विमा आणि... आजवरचा सर्वात मोठा आरोप विमान कंपनी आणि मेंटेनन्सचा सावळागोंधळ
ज्या
व्हीएसआर कंपनीच्या विमानाने अजित पवार प्रवास करत होते, त्या कंपनीच्या
कार्यपद्धतीवर रोहित पवार यांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत. कंपनीला हेव्ही
बेस मेंटेनन्स करता येत नव्हते का, आणि तरीही त्यांना सर्टिफिकेट कोणी
दिले, याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. खर्चात बचत करण्यासाठी विमान
कंपनी अतिरिक्त इंधन सोबत न्यायची आणि हे इंधन म्हणजे विमानासाठी चालता
बोलता बॉम्बच होता, अशी धक्कादायक माहिती रोहित पवार यांनी दिली. या
कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी
त्यांनी केली आहे.
मंत्र्यांचा त्याच कंपनीतून प्रवास आणि सुरक्षेचा प्रश्न
अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा जीव गेल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री आजही त्याच कंपनीच्या विमानाने प्रवास करत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे रोहित पवार म्हणाले. या अपघातामागील क्लिअरर इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर आणि मेंटेनन्स इंजिनिअरवर त्वरित कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रश्नांनी आता सरकारसमोर मोठी अडचण निर्माण केली असून अजित पवार यांच्या मृत्यूचे रहस्य मोसाद आणि पायलटच्या संशयाभोवती फिरू लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.