अजित पवारांच्या अपघाताच्या घटनेवर रोहित पवारांचं मोठं वक्तव्य, 'प्रमुख पायलट महिने-दोन महिने कुठल्या हॉटेलला भेटले...'
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक जणांकडून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
"माझे एक प्रामाणिक मत आहे. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी. 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत चौकशी व्हावी. जे प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले, महिनाभर - दोन महिने कुठल्या हॉटेलला भेटले, कुठे कुठे गेले होते, या सर्व गोष्टींची माहिती काढणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
रोहित पवार यांचा नरेश अरोरा यांच्याबाबत मोठा दावा
"रोहित पवार यांनी कन्सल्टंट असलेल्या
नरेश अरोरा यांच्या कंत्राटावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नरेश अरोरा
यांचं कोट्यवधींचं कंत्राट अजित दादांना रद्द करायचं होतं. या अरोरांनी
गेल्या काही दिवसांत 2 विमाने घेतली आहेत", असं रोहित पवार यांनी म्हटलं
आहे.
नरेश अरोरांच्या कंत्राटाबद्दल रोहित पवार काय म्हणाले?
"27 तारखेला नरेश अरोरा याच्या वतीने त्याचा शेकडो कोटींचा कंत्राट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला पैसे दिलेच गेले पाहिजेत, अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीत होती. पण त्याच्या विरोधातील भूमिका अजित पवारांची होती", अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी घेतली.
विकास लवांडे यांच्याकडून प्रश्न उपस्थित
राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी देखील प्रश्न
उपस्थित केले आहेत. "जे प्रश्न रोहित पवार यांना पडतात, ते खासदार सुनील
तटकरे, खासदार प्रफुल्ल तटकरे यांना का पडत नाहीत? मंत्री छगन भुजबळे यांना
का पडत नाहीत? त्यांच्यातले केवळ आमदार अमोल मिटकरी केवळ बोलताना दिसत
आहेत. या व्यतिरिक्त त्यांचा एकही मंत्री किंवा एखादा प्रमुख नेता का बोलत
नाहीत? असा प्रश्न आम्हाला पडतोय", अशी भूमिका विकास लवांडे यांनी मांडली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रमोद हिंदूराव यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रमोद हिंदूराव यांनी शोकसभेत बोलताना 27 जानेवारीला अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आला. फाईल मंत्रालयातून आणण्यासाठी वेळ झाला. त्यामुळे अजित पवार यांचे रस्ते मार्गाने बारामती जाण्याचा निर्णय रद्द झाला. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बॅग गाडीतही भरल्या होत्या. पण नंतर दुसऱ्या दिवशी विमानाने जाणार असल्याच्या निर्णयाने अजित पवार यांनी ड्रायव्हरला गाडीतून बॅग काढायला सांगितल्या, असं वक्तव्य प्रमोद हिंदूराव यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्यानंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं हिंदूराव यांनी स्पष्ट केलं.
सुरज चव्हाण यांची मोठी मागणी
राष्ट्रवादी
युवक काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी
आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करावी, अशी मागणी केली आहे. तसेच अजित
पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी आतापर्यंत कुठपर्यंत आली याची माहिती
महाराष्ट्राच्या जनतेला मिळावी, असं सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
विलीनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. "दादा आणि माझ्यात काय चर्चा झाल्या हे सांगणार नाही. आता दादाच नाही तर चर्चा सांगून काय उपयोग?", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.