सांगलीमधून अंगावर काटा बातमी समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांचा पोटच्या मुलासमोरच हत्या केली असल्याची संतापजनक घटना घडली आहे. शहरातील इनाम धामणी रोडवर ही हत्या करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती कुमार शेडबाळे (वय 50) असं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. किर्तीकुमार शेडबाळे हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणीजवळ असणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून जात होते. या दरम्यान रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन तरुणांसोबत किर्तीकुमार यांचा वाद झाला. हा वाद एवढा वाढला की अज्ञात तीन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की, या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला, तर हल्लेखोरांनी मुलाच्या समोरच वडिलांनाची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने हल्लेखोरांना पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून नेमका कोणत्या कारणातुन खून झाला,हे स्पष्ट होऊ शकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.