Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- शाळेला निघालेल्या मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; एरंडोलीत आठ जखमी, एक गंभीर

सांगली :- शाळेला निघालेल्या मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; एरंडोलीत आठ जखमी, एक गंभीर
 

एरंडोली : पिसाळलेल्या कुत्र्याने आज तीन शाळकरी मुलांसह आठ जणांना चावा घेतला. ही मुले सकाळी शाळेला निघाली होती. त्यातील एकाला गंभीर जखम झाली आहे. गुंडेवाडी रस्त्यानजीक शहापुरे सुपर मार्केटच्या समोर ही घटना घडली.  सुदर्शन कुंभार यांनी तातडीने काठी घेऊन त्या कुत्र्यावर हल्ला चढवला, त्यामुळे अन्य मुले वाचली. गेल्या सहा महिन्यांत एरंडोली परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. महापालिकेने शहरात पकडलेली कुत्री मिरज पूर्व भागात सोडण्याचा सपाटा लावला आहे. ही कुत्री झुंडीने फिरत आहेत, रात्री वाहनांचा पाठलाग करतात. त्यातील एक कुत्रे पिसाळलेल्या अवस्थेत आज सकाळी फिरत होते. एरंडोली हायस्कूलसमोरून हाकलण्यात आले. ते धावत शिपूर रस्त्याने शहापुरे मार्केटसमोर आले.

तेथून काही मुले एरंडोली हायस्कूलकडे निघाली होती. त्यातील तीन मुलांवर कुत्र्याने हल्ला केला. एकाच्या मांडीला गंभीर जखमी झाली. दोघांना दात लागले. तेथून पुढे आंबा स्टॉपच्या दिशेने कुत्रे गेले. तेथे अन्य पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला. कुणी त्याला हकलायला लागले की ते अंगावर धावून येत होते. हा गंभीर प्रसंग लक्षात घेत सुदर्शन कुंभार यांनी तातडीने काठी घेत त्या कुत्र्यावर हल्ला केला. त्यात ते ठार झाले. त्यामुळे अन्य लोक वाचले. जखमी मुलांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

तेथे त्यांना अँटिरेबिज इंजेक्शन देऊन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले. हा प्रसंग पाहणे भाऊसाहेब शहापुरे म्हणाले, ''कुत्रे पिसाळलेले होते, यात शंका नाही. कारण, ते दिसेल त्याला चावत सुटले होते. मुले घाबरली होती. काहींनी कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला तर त्याने त्याच लोकांना चावा घेतला.''


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.