Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सैन्य दल प्रमुख नरवणे पुस्तकाच्या वादाचा साईड इफेक्ट, आता सरकारने घेतला मोठा निर्णय, बड्या अधिकाऱ्यांवर संकट?

सैन्य दल प्रमुख नरवणे पुस्तकाच्या वादाचा साईड इफेक्ट, आता सरकारने घेतला मोठा निर्णय, बड्या अधिकाऱ्यांवर संकट?
 

सैन्य दल आणि सरकारशी संबंधित ज्येष्ठ अधिकाऱ्यांवर आता मोठे संकट येणार आहे. माजी सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार ऑफ डेस्टीनी’या पुस्तकावरुन उठलेले वादळ शमण्याचे नावच घेत नसल्याचे उघडकीस आले आहे. आता केंद्र सरकारने बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या लेखणी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सरकार आता सरकारी अधिकाऱ्यांच्या संदर्भात आचार संहिता जारी करण्याच्या विचार आहे.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी माजी सैन्य दल प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या आगामी 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकाचा संदर्भ संसदेत सांगितल्यानंतर मोठे वादळ निर्माण झाले. या पुस्तकाचे प्रकाशन झाले नसल्याचे त्याचा उल्लेख करणे योग्य नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोध करताना सांगितले.त्यानंतर सत्ताधारी पक्षाने राहुल गांधी यांना यावर बोलू दिले नाही. आणि प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर या संदर्भात माजी सैन्य दल प्रमुख मुकुंद नरवणे यांनी पेंगुईन प्रकाशनाच्या वतीने खुलासा केला. त्यांच्या पोस्टमध्ये पेंगुईन प्रकाशनाचे म्हणणे मांडले होते. या पुस्तकाच्या प्री ऑर्डरचा अर्थ पुस्तक प्रकाशित होणे असे नव्हे तर औपचारिक प्रकाशनानंतर हे पुस्तक प्रकाशित मानले जाईल असा खुलासा नरवणेयांनी प्रकाशनाच्या वतीने केला होता. 
 
अधिकाऱ्यांसाठी एक आचारसंहिता
आता सरकारने मोठ्या आणि महत्वाच्या पदांवरील सरकारी अधिकाऱ्यांसाठी एक आचारसंहिता आणण्याच्या बेतात आहे. त्यानुसार आता सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यासाठी निवृत्तीनंतर २० वर्षांची कुलिंग – ऑफ पिरीयड निश्चित केला जाऊ शकतो. हा अवधी पूर्ण होण्याआधी कोणाताही अधिकारी त्याचे पुस्तक वा त्याची स्मरणिका प्रकाशित करु शकत नाही. वृत्तपत्रानुसार आता या संदर्भात लवकरच औपचारिक आदेश जारी होण्याची शक्यता आहे. माजी सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे आत्मचरित्र ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टीनी’ राजकीय वाद सुरु झाला आहे. या पुस्तकात ऑगस्ट २०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये भारत- चीन सैन्यामध्ये झालेल्या संघर्षाची घटनेसंदर्भात केलेल्या दाव्यांनी संसदेत मोठा वाद निर्माण झाला होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.