विद्यार्थी आणि शिक्षकांमधील प्रेमकहाणी काही नवीन नाही, मात्र चक्क शिक्षिकेनं विद्यार्थ्याचं प्रपोज नाकारलं म्हणून विद्यार्थ्यानं धक्कादायक पाऊल उचललं. या घटनेत शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तातडीनं तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जात असताना रस्त्यात तिला अडवून गळ्यात जबरदस्तीनं हात टाकून तिच्या ओठांचा कडकडून चावा विद्यार्थ्याने बदला म्हणून घेतला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. महिला शिक्षिका क्लासमध्ये शिकवण्यासाठी
जात असताना विद्यार्थ्याने रस्ता अडवला. त्यानंतर महिलेवर त्याने गळ्यात
हात टाकून हल्ला केला. महिलेच्या ओठांचा चावा घेतला. ओठांमधून रक्त यायला
लागल्यानंतर विद्यार्थ्याने पळ काढला. जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये धक्कादायक घटना समोर आली. इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या एका माथेफिरू विद्यार्थ्याने आपल्याच महिला शिक्षिकेवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, गंभीर जखमी शिक्षिकेला उपचारासाठी आग्रा येथे हलवण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सदर आरोपी विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षिकेला त्रास देत होता. त्याने आधी शाळेतच शिक्षिकेची छेड काढली होती. याची तक्रार विद्यार्थ्याच्या पालकांकडे केल्यानंतर काही दिवस तो शांत राहिला, पण नंतर त्याने पुन्हा छळ सुरू केला. या जाचाला कंटाळून शिक्षिकेने ती शाळा सोडली आणि दुसऱ्या शाळेत रुजू झाल्या. मात्र, हा नराधम विद्यार्थी तिथेही तिचा पाठलाग करू लागला.घटनेच्या दिवशी शिक्षिका एका मुलाला ट्यूशन शिकवण्यासाठी त्याच्या घरी जात होत्या. तेव्हा या विद्यार्थ्याने त्यांना रस्त्यात अडवले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तो विद्यार्थी जबरदस्तीने शिक्षिकेच्या गळ्यात हात टाकून त्यांना पुढे ओढत नेत आहे. शिक्षिकेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने किंवा वस्तूने प्राणघातक हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.