Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकातील तरुणाचा मोठा निर्णय; लॉटरीत जिंकलेले 49 कोटी रुपये मित्रांमध्ये वाटणार, कारण...

कर्नाटकातील तरुणाचा मोठा निर्णय; लॉटरीत जिंकलेले 49 कोटी रुपये मित्रांमध्ये वाटणार, कारण...
 

एखाद्या व्यक्तीने जर लॉटरी जिंकली, तर तो सर्व गोष्टी गुपित ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कर्नाटकातील एका तरुणाने लॉटरीत जिंकलेली कोट्यवधीची रक्कम मित्रांमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला आहे. शांतनु शेट्टीगर असे या तरुणाचे नाव असून, तो मूळ उडुपी जिल्ह्यातील कटपडी मट्टू गावचा रहिवासी आहे.

फोनवर मिळाली आनंदाची बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, एनआरआय असलेल्या शांतनु शेट्टीगर याने अबू धाबी येथे झालेल्या बिग टिकट लकी ड्रॉमध्ये तब्बल 2 कोटी दिरहम (सुमारे 49 कोटी रुपये) जिंकले आहेत. या ड्रॉमध्ये एक मोठा जॅकपॉट आणि इतर अनेक बक्षिसांचा समावेश होता. या लॉटरीतील पाच विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख दिरहम आणि एक आलिशान कार देण्यात आली. हा ड्रॉ लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात आला होता, ज्याला जगभरातील हजारो प्रेक्षकांनी पाहिले. 
 
सध्या ओमानमधील मस्कट शहरात कार्यरत असलेल्या शांतनु शेट्टीगर याने तिकीट क्रमांक 305810 (सीरिज 283) खरेदी केले होते. अचानक आलेल्या एका फोन कॉलद्वारे त्याला या मोठ्या विजयाची माहिती मिळाली. लाईव्ह ड्रॉदरम्यान आयोजकांशी बोलताना शांतनु म्हणाला, या विजयामुळे मी खूप आनंदी आहे. मात्र, या रकमेचा नेमका वापर कसा करायचा, याचा निर्णय अजून घेतलेला नाही.
मित्रांमध्ये पैसे वाटणार...

शांतनु शेट्टीगर याने सांगितले की, हे तिकीट त्याने एका मित्रासोबत मिळून खरेदी केले होते. बिग टिकटच्या नियमांनुसार, ही संपूर्ण बक्षिसाची रक्कम दोघांमध्ये समान वाटली जाणार आहे. दरम्यान, या विजयानंतर शांतनु बिग टिकटच्या इतिहासातील मोठ्या विजेत्यांपैकी एक ठरले असून, ते रातोरात कोट्यधीश बनला आहे.

पाच वर्षांची सातत्यपूर्ण प्रयत्नांची फळे
शांतनुने भावूक प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्या मुलीमुळेच माझे नशीब बदलले असे मला वाटते. या विजयाची मला अजिबात अपेक्षा नव्हती. विशेष म्हणजे, शांतनु शेट्टीगर गेल्या पाच वर्षांपासून बिग टिकटमध्ये सहभागी होत होता. सुरुवातीला अधूनमधून तिकीट खरेदी करणाऱ्या शांतनुने गेल्या तीन वर्षांत एकही ड्रॉ चुकवलेला नाही. आता अखेर त्याच्या प्रयत्नांचे फळ त्याला मिळाले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.