तुंग : कसबे डिग्रज (ता. मिरज) हा जिल्हा परिषद मतदारसंघ दोन विधानसभा मतदार संघांत विभागला गेला आहे. अपवाद वगळता हा गट सातत्याने कायमच अटीतटीच्या लढतीसाठी ओळखला जातो. हा गट काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तर पंचायत समितीला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ मिळते.
सध्या या गटात महविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी नवी लढत रंगणार आहे. या जिल्हा परिषद गटात सांगली विधानसभा मतदारसंघातील नांद्रे व पद्माळे, तर वाळवा विधानसभा मतदारसंघातील कसबे डिग्रज व मौजे डिग्रज या गावांचा समावेश आहे. आतापर्यंत या गटात कसबे डिग्रज या मोठ्या गावाला सातत्याने संधी मिळत आली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाप रिषद गटासाठी काँग्रेसकडून प्रशांत अवधूत, तर गणामध्ये राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार पक्ष) सुधीर देशमुख, तर नांद्रे गणासाठी राष्ट्रवादीकडून (अजित पवार) संयोगिता कोळी मैदानात आहे.दुसरीकडे, महायुतीत जागा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काँग्रेस व्हाया भाजप असा प्रवास करत शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळवत महावीर पाटील स्वतंत्र लढत देत आहेत. महायुतीत कसबे डिग्रज गट व गण जनसुराज्य व भाजपला सोडण्यात आला. यामध्ये जनसुराज्य, भाजप आणि रयत क्रांती यांची महायुती झाली आहे. कसबे डिग्रज गटामध्ये जनसुराज्यकडून पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते प्रदीप पाटील लढत आहेत. कसबे डिग्रज गणातून 'रयत क्रांती'चे जिल्हाध्यक्ष विनायक जाधव भाजपकडून लढत आहेत. नांद्रे गणातून जनसुराज्यकडून नसिमाबी मुल्ला लढत आहेत.
तिरंगी
लढतीमुळे नेत्यांची ताकद पणाला लागली आहे. 'वंचित'कडून परीट हे लढत देत
आहेत. खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, निशिकांत पाटील, राजू शेट्टी
यांनी एकत्रितपणे पॕनेल उभे केले आहे. त्यांना ग्राम व जिल्हापातळीवरील
नेते साथ देत आहेत. महायुतीमध्ये शिवसेना व जनसुराज्य यांची विभागणी झाली
आहे. भाजपकडून
जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील व आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत,
समित कदम यांनी उमेदवाराच्या मागे ताकद उभी केली आहे. शिवसेना शिंदे
गटाकडून महावीर पाटील एकाकी लढत देत आहेत.
दृष्टिक्षेपात...
कसबे डिग्रज गट सर्वसाधारण पुरुषपंचायत समितीसाठी कसबे डिग्रज गण सर्वसाधारण, तर नांद्रे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आहे.कसबे डिग्रज गट गावे - कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, पद्माळे, नांद्रे, नावरसवाडीकसबे डिग्रज गण- कसबे डिग्रज, पद्माळेनांद्रे गण- नांद्रे, नावरसवाडी, मौजेडिग्रजकसबे डिग्रज गट मतदार संख्या -२८८००कसबे डिग्रज गण-१४०००नांद्रे गण- १४८००
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.