Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॉपीमुक्तीचा यंदापासून 'सांगली पॅटर्न'

कॉपीमुक्तीचा यंदापासून 'सांगली पॅटर्न'
 

सांगली :- शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा नवा आदर्श निर्माण करणारा कॉपीमुक्तीचा शिराळा पॅटर्न आता 'सांगली पॅटर्न' म्हणून राज्यभर चर्चेत आला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून बारावीच्या परीक्षांसाठी राबविण्यात येणारा हा अभिनव उपक्रम शिराळा तालुक्यात दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी 'कॉपीमुक्त अभियान' राबवले जाते.

मध्ये तत्कालीन प्रशिक्षणार्थी तहसीलदार विशाल नरवाडे यांनी शून्य खर्चाचा यशस्वी पॅटर्न राबविल होता, तालुक्यात यशस्वीपणे राबवण्यात आला होता. त्यानंतर २०२६ मध्ये जिल्हा पातळीवर सीईओ असताना नरवाडे यांनी त्याची अंमलबजावणी केली असून, प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.  या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकही रुपयांचा अतिरिक्त खर्च न करता, पारंपरिक फिरती पथके किंवा मोठ्या तपासणी यंत्रणेची गरज न भासता, केवळ मोबाईल कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर थेट नजर ठेवण्यात येत आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रातील वर्गखोल्यांमधील चित्रफीत झूम-अप प्रणालीद्वारे जिल्हा परिषद सनियंत्रण कक्षात थेट प्रसारित केली जाते. यासाठी शासनाकडून आवश्यक परवानगी घेण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यात यंदा ३२,५०४ विद्यार्थी, ५२ परीक्षा केंद्रांवर, एकूण १,३०७वर्गखोल्यांमध्ये बारावीची परीक्षा देत आहेत. सर्व केंद्रांवर तांत्रिक सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली असून, कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.
 
या उपक्रमाचा उद्देश कारवाई करणे नसून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळावा, असे सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी चित्रफीत रेकॉर्ड करून पुरावे जतन केले जात असले, तरी त्याचा भर दहशत निर्माण करण्यावर नसून कॉपीला आळा घालण्यावर आहे. राज्यातील हा एकमेव इतका पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रम मानला जात असून, 'शिराळा पॅटर्न' म्हणून सुरू झालेला हा प्रयोग आता 'सांगली पॅटर्न' म्हणून राज्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, शिस्त आणि विश्वास निर्माण करणारा हा उपक्रम भविष्यात इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.