प्रफुल्ल पटेलांची फाईल क्लिअर करण्यासाठी थांबले अन् अजितदादांना उशीर झाला, ते विमानाने गेले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
कल्याण : "महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी कारने रस्तामार्गे बारामतीला जाणार होते. त्यासाठी सर्व तयारीही झाली होती. परंतु त्या वेळेस प्रफुल्ल पटेल यांचा महत्त्वाच्या कामासाठी फोन आला. माझ्या कामाची फाईल मंत्रालयात पडून आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर अजितदादांनी सेक्रेटरीला सांगितलं की, "मी नंतर आठवडाभर नाहीये. त्यांची फाईल घेऊन ये"..मात्र, त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कारऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. त्याच विमानाला अपघात झाला आणि आपण अजिदादांसह 5 जणांना गमावले", अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांनी दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या पुढाकाराने 1 फेब्रुवारी 2026 रोजी अजित पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणच्या मंगेशी बैंक्वेट सभागृहात ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमोद हिंदूराव बोलत होते.
अजितदादांच्या अपघाताची बातमी आपल्याला फोनद्वारे समजली, लगेचच त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर पुढील तीन तास आपण सुन्न झालो होतो. जिल्हा परिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी अजितदादा बारामतीमध्ये सभा घेणाार होते. सभेला जाण्यासाठी आदल्या दिवशी संपूर्ण तयारी केली. सर्व सामान कारगाडीत भरले, जाण्याची तयारी झाली तेवढ्यात प्रफुल्ल पटेल यांनी एका कुठल्यातरी कामाची फाईल आणली. ते काम करता करता उशिर झाला आणि अजितदादांनी गाडीनेने जाण्याऐवजी दूसरे दिवशी विमानाने जाण्याचे ठरविले. त्यानंतर अकल्पित घटना घडली, अशी आपल्याला माहिती मिळाल्याचे प्रमोद हिंदूराव यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.