राजस्थानच्या 'या' आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार रश्मिका-विजयचा लग्नसोहळा! भाडं ऐकून थक्क व्हाल, एक दिवसासाठी तब्बल.
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघंही येत्या २६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. रश्मिका-विजय गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र,
या दोघांनीही कधीच आपलं नातं जाहीरपणे मान्य केलं नव्हतं. आम्ही फक्त
चांगले मित्र आहोत असंच या दोघांकडून सांगितलं जायचं. अखेर रविवारी ( २२
फेब्रुवारी ) रात्री उशिरा इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत विजय-रश्मिकाने 'द
वेडिंग ऑफ विरोश' असं कॅप्शन देत त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली.
विजय-रश्मिकाचा शाही विवाहसोहळा राजस्थानमध्ये पार पडणार आहे. लग्नासाठी त्यांनी उदयपूरपासून साधारण २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या 'आयटीसी मेमेंटोस' ( Mementos by ITC Hotels Ekaaya ) या लक्झरी हॉटेलची निवड केली आहे. 'आयटीसी मेमेंटोस' हे आलिशान हॉटेल
शहराच्या गर्दीपासून दूर निसर्गरम्य वातावरणात स्थित आहे. याठिकाणी आलेल्या
पर्यटकांना निसर्गरम्य वातावरण अन् शांततेचा अनुभव घेता येईल. इथून जवळच
अरवली पर्वतरांगा सुद्धा आहेत. आता या आलिशान हॉटेलमध्ये एक दिवस
राहण्यासाठी नेमका किती खर्च येईल हे थोडक्यात जाणून घेऊयात…
या
हॉटेलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, याठिकाणी येणारे पर्यटक विविध श्रेणींमधील
खोल्या राहण्यासाठी निवडू शकतात. व्हॅली व्ह्यू व्हिला, लेक व्ह्यू
व्हिला, प्रीमियम व्हिला, अरवली Suits, मेमेंटोस Suits अशा विविध श्रेणीतील
खोल्या याठिकाणी उपलब्ध आहेत. याठिकाणी प्रेसिडेंशियल आणि ग्रँड
प्रेसिडेंशियल हे विशेष लक्झरी Suits देखील आहेत. हे सगळे व्हिला स्विमिंग
पूल, जकूझी या सुविधांनी परिपूर्ण असे आहेत.
आयटीसी मेमेंटोसमध्ये एक दिवस राहण्यासाठी किती खर्च येतो?
व्हॅली व्ह्यू व्हिला आणि व्हॅली व्ह्यू व्हिला ट्विन - २८ हजार ३९९ ते २८ हजार ६६६लेक व्ह्यू व्हिला - ३० हजार ७९९ ते ३१ हजार ८८प्रीमियम व्हिला - ३४ हजार ७९९ ते ३५ हजार १२६अरवली Suits - ५७ हजार १९९ ते ७१ हजार ४९९मेमेंटोस Suits - ७३ हजार १९९ ते ९१ हजार ४९९प्रेसिडेंशियल आणि ग्रँड प्रेसिडेंशियल या लक्झरी रूमच्या किंमती पर्यटकांच्या विनंतीनुसार मॅनेजमेंटकडून सांगितल्या जातात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.