Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टीपू सुल्तानच्या अंगठीवर राम कोरलेलं, गांधी ते कलाम यांनीही टीपूबद्दल लिहिलंय; ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

टीपू सुल्तानच्या अंगठीवर राम कोरलेलं, गांधी ते कलाम यांनीही टीपूबद्दल लिहिलंय; ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल
 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संपकाळ यांनी टिपू सुल्तानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकाळ यांच्यावर घणाघाती टीका केलीय. ही लाजीरवाणी बाब असून जोडे चाटण्याचा प्रकार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. तर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. टिपू सुल्तान हिंदू मुस्लिम एकतेचं उदाहरण होते असं ओवैसी यांनी म्हटलंय.

१७९९ मध्ये टिपू सुल्तानचा मृत्यू झाला. इंग्रजांशी लढून त्यांचा मृत्यू झाला. टीपूने तुरुंगात बसून तुमच्या वीरांसारखं इंग्रजांना लव्ह लेटर लिहिलं नाही. इंग्रजांच्या ताब्यातून आपलं राज्य स्वतंत्र करण्यासाठी तो शहीद झाला. इंग्रजांना टीपूची इतकी भीती होती की दीड तास त्याचा मृतदेह पडून होता. इंग्रजांची फौज आजूबाजूला असूनही मृतदेहाजवळ जात नव्हते. त्यांना भीती होती की अचानक उठला तर काय होईल? दीड तासानंतरही त्याचं शरीर गरम होतं असं ओवैसींनी म्हटलं.

टीपूकडे जी अंगठी होती त्यावर राम लिहिलं होतं हे खरं नाही का? असा प्रश्नही ओवैसींनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला. २०१४ मध्ये बर्सानियात या अंगठीचा लिलाव झाला. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की रॉकेट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून टीपूच्या स्वप्नांना पूर्ण करत आहोत. एपीजे अब्दुल कलाम तर तुमच्यासाठी आदर्श आहेत असंही ओवैसी म्हणाले.
 
ओवैसी यांनी पुढे म्हटलं की, तुम्ही कुणाला मानत नसलात तरी गांधींना तरी मानत असाल. त्यांनी यंग एजमध्ये लिहिलं होतं की टिपू सुल्तान हिंदू मुस्लिम एकतेचे समर्थक होते. श्रृंगेरी मठातून फौजेनं सोन्याची मूर्ती उचलली तेव्हा टिपू सुल्तानने त्याचं बांधकाम केलं. टिपू सुल्तान बादशहा होता. त्याच्या फौजेचे कमांडर अप्पाजी राम होते तर सल्लागार कृष्णा राव होते. भाजप फक्त द्वेष पसरवतंय. भारताच्या पहिल्या संविधानाच्या पुस्तकातही टीपूचा फोटो आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.