कोट्यवधींची संपत्ती असूनही कर्जामुळे अवघ्या दोन दिवसांत मुंबईतील
राहतं घर हातातून गेलं; हार्दिक जोशीच्या कुटुंबात नेमकं काय घडलं?
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वात 'राणादा' म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत त्याने आपल्या आयुष्यातील संघर्ष, कुटुंबावर आलेलं आर्थिक संकट आणि यशामागची कहाणी अत्यंत प्रांजळपणे मांडली. त्याच्या या खुलाशांमुळे चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील अनोळखी पैलू समजले.
ऐश्वर्यापासून आर्थिक संकटापर्यंत
हार्दिकने सांगितले की, एकेकाळी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम होती. वडिलांचा लेदर स्क्रॅपचा व्यवसाय होता आणि परदेशी व्यापारातही त्यांची चांगली उलाढाल होती. घरात सुख-सुविधांची कमतरता नव्हती. 'मी दहावीत असताना आमच्याकडे ११ गाड्या होत्या. रोज वेगवेगळ्या गाडीतून शाळेत जात होतो. इतकं सगळं असूनही आई मात्र हातात फक्त तीन रुपये द्यायची. त्यामुळे लहानपणापासूनच गरजा मर्यादित ठेवण्याची सवय लागली,' असे तो हसत सांगतो.मात्र 2006साली परिस्थितीने अचानक पलटी घेतली. परदेशी व्यवहारात मोठा तोटा झाल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं. कर्जाचा ताण वाढत गेला आणि अवघ्या 48 तासांत मुंबईतील राहतं घरासह बहुतांश मालमत्ता विकावी लागली. "विश्वास बसणार नाही, पण ४८ तासांत सगळं संपलं. फक्त गावचं घर शिल्लक राहिलं," असा भावनिक खुलासा हार्दिकने केला.
संघर्षाचे दिवस
या
आर्थिक धक्क्यानंतर कुटुंबाने नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न सुरू केला.
हार्दिकनेही परिस्थितीसमोर न डगमगता स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू
ठेवला. काही काळ तो बोईसर ते दादर असा दररोज प्रवास करत होता. त्यानंतर
एन्टॉप हिल येथे भाड्याने घर घेतले; मात्र वाढत्या भाड्यामुळे ठाणे आणि
मुलुंड असा प्रवासही त्याला करावा लागला. या सगळ्या काळात आर्थिक चणचण,
प्रवासाचा त्रास आणि अनिश्चित भविष्य यांचा सामना करत त्याने जिद्द सोडली
नाही.
बॅकग्राऊंड डान्सर ते 'राणादा'
हार्दिक
जोशीने करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली. छोट्या-मोठ्या
भूमिका, ऑडिशन्स आणि नकारांचा सामना करत त्याने अनेक वर्षे मेहनत घेतली.
हिंदी मालिकांमध्येही त्याने काम केलं. अभिनयाच्या क्षेत्रात टिकून
राहण्यासाठी संयम आणि चिकाटी किती महत्त्वाची असते, हे त्याने प्रत्यक्ष
अनुभवले.
२०१६
साली प्रदर्शित झालेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे त्याच्या
आयुष्याला निर्णायक वळण मिळालं. कोल्हापूरच्या रांगड्या 'राणादा'ची भूमिका
साकारण्यासाठी त्याने भाषाशैली, देहबोली आणि शारीरिक बांधा यावर विशेष
मेहनत घेतली. त्याच्या नैसर्गिक अभिनयामुळे ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय
ठरली आणि हार्दिक घराघरात पोहोचला.
संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्त्व
आज यशाच्या शिखरावर असतानाही हार्दिक त्या कठीण दिवसांना विसरलेला नाही. 'परिस्थितीने खूप काही शिकवलं. पैशाची किंमत, कुटुंबाचं महत्त्व आणि मेहनतीची ताकद त्या काळात कळली,' असे तो सांगतो. ऐश्वर्यापासून शून्यापर्यंत आणि पुन्हा यशापर्यंतचा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हार्दिक जोशीची ही कहाणी केवळ एका अभिनेत्याची नाही, तर संकटावर मात करून उभं राहण्याच्या जिद्दीची आहे. संघर्ष, संयम आणि सातत्य यांच्या बळावर स्वप्न पूर्ण करता येतात, याचं जिवंत उदाहरण म्हणजे हार्दिक जोशी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.