Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली बाजार समिती सभापतीपदासाठी मोठं राजकारण : विशाल पाटलांनी घेतलेला राजीनामा अखेर नलवडेंनी 'योग्य' ठिकाणी पोहोचवलाच!

सांगली बाजार समिती सभापतीपदासाठी मोठं राजकारण : विशाल पाटलांनी घेतलेला राजीनामा अखेर नलवडेंनी 'योग्य' ठिकाणी पोहोचवलाच!
 
 
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी बुधवारी (ता. 18) सभापतिपदाचा राजीनामा दिला. शिंदे यांच्या राजीनाम्याचे पत्र समितीच्या १२ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्याकडे सादर केले. दरम्यान, आता नवे सभापती कोण, याची उत्सुकता आहे. नवीन सभापती निवडीसाठी सहकार उपनिबंधकांनी प्राधिकृत अधिकारी लवकरच नियुक्त करीत असल्याचे सांगितले.

बाजार समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे संचालक जास्त असल्याने काँग्रेसचे सुजय शिंदे यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. त्यांनी पावणेतीन वर्षे या पदावर काम केले. काही संचालकांच्या म्हणण्यानुसार सभापतिपद सव्वा वर्षासाठी ठरले होते. त्यांचा राजीनामा घेऊन नव्या संचालकांना सभापतिपदी संधी देण्यात यावी, अशी मागणी होती. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यामध्ये बदल केला नव्हता.

जिल्हा परिषद निवडणुकीत कसबेडिग्रज गटातून बाजार समिती संचालक आनंदराव नलवडे यांच्या चिरंजीवांनी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सभापती बदलाबाबत घडामोडी घडल्या. खासदार विशाल पाटील यांनी शिंदेंचा राजीनामा मागून घेतला. त्यानंतर संचालक नलवडे यांचा अर्ज निवडणुकीतून काढून घेण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. मात्र शिंदे यांनी राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलेला नव्हता. खासदार विशाल पाटील यांच्याकडून नलवडे यांनी हे राजीनामा पत्र घेतले. ते पत्र जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांच्याकडे बुधवार (ता. 18) सायंकाळी दिले. सहकार उपनिबंधक चव्हाण यांनी सभापती शिंदे यांचा राजीनामा मिळाला असल्याचे सांगितले. यापुढील कार्यवाहीसाठी एक अधिकारी नियुक्त करीत असल्याचे सांगितले. नलावडे यांनीही खासदार विशाल पाटील यांनी सभापतींच्या राजीनामा घेतला होता. तो राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला असल्याचे सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.