रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता तुम्हाला चांगली नोकरी करण्याची
संधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक सर्व्हिसेस बोर्ड (RBISB)ने नॉन सीएसजी
(Non-CSG) कॅडर्ससाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन
जारी केले आहे. या नोकरीबाबत ६ फेब्रुवारी रोजी opportunities.rbi.org.in
वेबसाइटवर सविस्तर माहिती दिली जाईल.
RBI नॉन सीएसजी कॅडर भरती
रिझर्व्ह बँकेत लीगल ऑफिसर ग्रेड बी, मॅनेजर (टेक्निकल सिविल) ग्रेड बी, मॅनेजर (टेक्निकल इलेक्ट्रिकल) ग्रेड बी, असिस्टंट मॅनेजर ग्रेड, असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकोल अँड सिक्युरिटी) ग्रेड ए पदांसाठी भरती होणार आहे. २१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पात्रता
लीगल
ऑफिसर पदासाठी उमेदवारांनी लॉमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी.
मॅनेजर(टेक्निकल सिविल) पदासाठी सिविल इंजिनियरिंगमध्ये बॅचलर पदवी प्राप्त
केलेली असावी. मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल ) पदासाठी इलेक्ट्रिक किंवा
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
पगार
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ६ फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून सुरु केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी २१ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी ग्रेड ए ऑफिसर पदासाठी ६२,५०० रुपये पगार मिळणार आहे. ग्रेड बी ऑफिसर पदासाठी ७८,४५० रुपये पगार मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.