Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

द्राक्ष पाण्याने धुत आहात? सावधान, ही खूप मोठी चूक टाळा, ही आहे योग्य पद्धत.

द्राक्ष पाण्याने धुत आहात? सावधान, ही खूप मोठी चूक टाळा, ही आहे योग्य पद्धत.
 

उन्हाळ्याचा हंगाम म्हटले की, बाजारात विविध प्रकारची द्राक्षे येतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याची मजाच काही वेगळी असते. अगदी स्वस्तात द्राक्ष मिळतात शिवाय चांगली ताजी. विविध प्रकारची काळी हिरवी द्राक्ष सध्या मार्केटमध्ये आहेत. बाजारातून द्राक्ष आपण आणतो आणि थेट नळाखाली पकडून ती धुतो आणि लगेचच खातो.
पण तुमची हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. द्राक्षाला पाण्याने धुणेच फक्त पुरे नाही तर मिठाच्या पाण्यात द्राक्ष काही वेळ भिजत खाला आणि मग त्याला व्यवस्थित पुन्हा धुवून घ्या. त्यानंतर कपड्याने ही द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या. पाण्यामध्ये व्हिनेगर मिक्स करा आणि त्यामध्ये द्राक्ष भिजत घाला. यानेही द्राक्षावरील कीटाणूंना मारण्यास मदत होते. द्राक्ष फक्त पाण्याने धुवून काही होत नाही. त्याला व्यवस्थित धुवावे लागते. जर आपण असे केले नाही तर पोटाच्या असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात, यामुळे द्राक्ष धुताना काळजी घ्या. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.