सांगली : अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे आज-गुरुवारपासून रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरु होत आहे. बुधवारी सायंकाळी चाँद दिसल्यामुळे मुस्लिम बांधवांच्या उपवासांना आज पासून सुरुवात होत आहे.
चाँद कमिटीने 19 पासून रमजान सुरू होणार असल्याची घोषणा केली. चंद्रदर्शननंतर एकमेकाना चाँद मुबारक म्हणून शुभेच्छा देण्यात येत होत्या. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव नवव्या महिन्यात 29-30 दिवसांचा रोजा ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फितर म्हणजे ईद साजरी केली जाते. ईदसुद्धा चंद्रदर्शनानेच साजरी केली जाते. बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यामुळे गुरुवारपासून रमजानला प्रारंभ होत आहे. मुस्लिम बांधवांनी बुधवारी सायंकाळी सर्व मशिदींमध्ये तराबिहची नमाज अदा केली. ही नमाज आता 29 दिवस अदा केली जाणार आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर आज बाजारात फळ, खजूरसह इतर साहित्यांच्या खरेदीला मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. उपवासासाठी खजूरची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे दत्त मारुती रोड, कापड पेठ, बालाजी चौकात अनेक ठिकाणी स्टॉल लागले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.