पुणे घाणेरडे शहर, बिल गेट्सच्या माजी सल्लागाराने व्यक्त केलेला तिरस्कार, एपस्टीन फाइल्समध्ये धक्कादायक खुलासा
शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एपस्टिन फाइल्सच्या आणखी एका आवृत्तीत बदनाम आर्थिक सल्लागार एपस्टीन आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे माजी सल्लागार बोरिस निकोलिक यांच्यातील ईमेल चॅटिंग समोर आले आहे. जेफ्री एपस्टीनला २०१२ मध्ये पाठवलेल्या ईमेलमध्ये, निकोलिक यांनी भारताविषयी विशेषतः पुणे शहराबद्दल आपला तिरस्कार वारंवार व्यक्त केला होता.
पुण्याबद्दल काय म्हटले?
अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी जेफ्री एपस्टीन फाइल्सचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संच प्रसिद्ध केला. या प्रचंड संचामध्ये ३० लाखांहून अधिक पानांची कागदपत्रे आणि हजारो छायाचित्रे आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या फाइल्समध्ये बोरिस निकोलिक आणि जेफ्री एपस्टाईन यांच्यातील पत्रव्यवहाराचा समावेश होता. एपस्टीन हा लैंगिक गुन्हेगार म्हणून दोषी ठरले होते आणि २०१९ मध्ये तुरुंगात असताना त्यांनी आत्महत्या केली होती.
हे ईमेल २०१२ मध्ये निकोलिक भारतात प्रवास करत असताना पाठवले गेले होते. निकोलिक, ज्यांना न्यूयॉर्क टाइम्सने एकेकाळी बिल गेट्स यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून वर्णन केले होते, त्यांनी पुण्याला 'अत्यंत घाणेरडे' म्हटले आणि सांगितले की त्यांनी दोन दिवस हॉटेलमधून बाहेर पडण्यास नकार दिला होता."माझी आवडती जागा नाही. तुम्हाला तर या जागेचा खूप तिरस्कार वाटेल," असे निकोलिक यांनी १ जून २०१२ च्या ईमेलमध्ये एपस्टीन याला पुण्याबद्दल सांगितले. "अगदी जगाच्या टोकावर - पुणे, भारत." त्यानंतर सांगितले की, ते पुढील २० तास प्रवास करणार आहेत, न्यूयॉर्कला पोहोचतील आणि भारत व चीनचा त्यांचा दौरा "खूप व्यस्त" होता, असे सांगून त्यांनी आपल्या शांततेबद्दल माफी मागितली.पहिल्या ईमेलनंतर काही तासांनी पाठवलेल्या दुसऱ्या ईमेलमध्ये, निकोलिक यांनी पुण्याचे खूप घाणेरडे शहर असे वर्णन केले. "भेटण्याची वाट पाहू शकत नाही. इथे खूप घाण आहे!! गेल्या २ दिवसांपासून हॉटेलमधून बाहेर पडण्यास नकार दिला आहे," असे म्हणत त्यांनी डोळा मिचकावणारा इमोजी पाठवला. एपस्टीनने एकाच शब्दात उत्तर दिले - "जबरदस्त,".
त्यानंतर
निकोलिक यांनी त्यांच्या विमानाचे उड्डाण उशिरा उड्डाण झाल्याबद्दल निराशा
व्यक्त केली आणि भारताविषयीचा आपला तिरस्कार स्पष्ट शब्दांत पुन्हा व्यक्त
केला."मला खूप राग आला आहे. या मूर्खांनी पुण्याहून येणारे विमान उशिरा
केले आणि आता मी नवी दिल्लीत अडकलो आहे. तुम्हाला भेटायला येऊ शकणार नाही.
मला या जागेचा तिरस्कार वाटतो. आता इथे आणखी एक रात्र काढावी लागेल, या
विचारानेच मला मळमळ होत आहे," असे ते म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.