Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

८ मिनिटांत पाठदुखी कायमची नाहीशी होईल; फक्त सकाळी उठताच आधी 'हे' एक काम करा, परिणाम पाहून थक्क व्हाल

८ मिनिटांत पाठदुखी कायमची नाहीशी होईल; फक्त सकाळी उठताच आधी 'हे' एक काम करा, परिणाम पाहून थक्क व्हाल
 

पाठीचा त्रास हा आजकाल फारच सामान्य होत चाललेला त्रास आहे. लहान वयातच अनेकांना पाठीचे दुखणे सतावते आहे, जे पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित समजले जायचे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीची बसण्याची पद्धत, तासन् तास मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करणं, शरीराची हालचाल कमी होणं, पोषणमूल्यांची कमतरता आणि तणावपूर्ण जीवनशैली.

अनेकदा हे दुखणं औषधांनी थांबत नाही आणि मग माणूस हताश होतो. डेस्क जॉब्स, तासन् तास स्क्रीनसमोर वाकून बसणं, मोबाईल फोन वापरणं इत्यादींमुळे तरुणांमध्येही पाठदुखीचे आजार वाढले आहेत. ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्या मते, अगदी तरुण लोकही त्यांच्याकडे पाठदुखीची तक्रार घेऊन येतात. एकंदरीत कंबरदुखी, पाठदुखी आता फक्त वृद्धांची समस्या न राहता, तरुणांनाही याचा त्रास होत आहे. बऱ्याचदा लोक या वेदनेकडे दुर्लक्ष करतात किंवा फक्त औषध घेऊन, त्यावर उपचार करतात; पण खरा उपाय तुमच्या शरीराच्या हालचालींत आहे. जर तुम्ही सकाळी फक्त आठ मिनिटे वेळ काढून कंबरेचा साधा व्यायाम केला, तर तुम्हाला अगदी जुनाट जडपणा आणि वेदनांपासूनही आराम मिळू शकतो.
 
पाठदुखी दूर करण्यासाठी ८ मिनिटांचा फॉर्म्युला
फिटनेस तज्ज्ञांच्या मते, पाठदुखी कमी करण्यासाठी जास्त व्यायामाची आवश्यकता नसते. थोडे स्ट्रेचिंग आणि हालचाल केल्यानेदेखील वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. चला तर मग हे व्यायाम जाणून घेऊया.

पेल्विक टिल्ट (२ मिनिटे): ही हालचाल करण्यासाठी, पाठीवर झोपा आणि तुमचे गुडघे वाकवा. तुमची कंबर हळूहळू थोडेशी वर करा. त्यामुळे तुमच्या मणक्यावरील ताण कमी होतो.

कैट-काऊ स्ट्रेच (२ मिनिटे): या हालचालीसाठी गुडघ्यांवर आणि हातांवर या. आता वर पाहत श्वास घ्या. पाठ वर करा आणि श्वास सोडा. ही हालचाल दोन मिनिटे पुन्हा करा.

बर्ड-डॉग मूवमेंट (२ मिनिटे): या स्थितीत असताना, एक बाजूचा हात आणि त्याच्या विरुद्ध बाजूचा पाय सरळ बाहेर काढा. त्यामुळे तुमचे संतुलन सुधारते आणि मणक्याला आधार देणाऱ्या लहान स्नायूंना बळकटी मिळते.

ग्लूट ब्रिज (२ मिनिटे): पाठीवर झोपा आणि तुमची कंबर वर करा. त्यामुळे तुमची पाठ आणि कंबर मजबूत होते. तसेच एकाच जागी जास्त वेळ बसल्यामुळे होणारे पाठीचे दुखणे कमी होते.
सकाळी हे व्यायाम केल्यास काय होईल?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा तुम्ही सात-आठ तासांच्या दीर्घ झोपेनंतर जागे होता तेव्हा तुमचे स्नायू आणि सांधे कडक होतात. मग, सकाळी उठून कामाला लागताच, तुमच्या पाठीच्या स्नायूंवरचा भार वाढतो. या आठ मिनिटांच्या दिनचर्येमुळे रक्ताभिसरण वाढते आणि सांध्यांतील द्रवपदार्थ सक्रिय होतात. त्यामुळे सकाळी जाणवणारा पाठीच्या कडकपणाचा त्रास दूर होतोच; त्याशिवाय दिवसभर चुकीच्या स्थितीत राहिल्याने होणाऱ्या वेदनाही टाळता येतात.

तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन करा
जर तुमची पाठदुखी तीव्र स्वरूपाची असेल, तर स्वतःहून कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी फिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यायाम करताना तुमच्या पाठीला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. हळूहळू सुरुवात करा आणि हळूहळू तुमच्या शरीराला या हालचालींची सवय होऊ द्या.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.