Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र हादरला! आठवीतील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक

महाराष्ट्र हादरला! आठवीतील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक
 
 
चंद्रपूर : शहरातील एका नामांकित शाळेत एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. गोवर्धन गोंडाणे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?
शाळेतील शिक्षक वर्गातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळालेली होती. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तातडीने शाहनिशा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने साध्या वेशात शाळेत जाऊन चौकशी केली. प्राथमिक तपासात तथ्य आढळताच महिला व बालविकास विभागाने विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी सहा मुलींनी या शिक्षकाच्या कृत्यांचा पाढाच वाचला. त्यावरून त्याला अटक केली.
पीडित मुलींनी काय सांगितलं?

आरोपी गोवर्धन गोंडाणे हा मागील अनेक वर्षांपासून याच शाळेत कार्यरत होता. तो वर्गात शिकवताना मुलींकडे अत्यंत वाईट नजरेने बघायचा. शाबासकी देण्याच्या नावावर शरीराला अश्लील स्पर्श करणे, मांडीला हात लावणे आणि संगणक लॅबमध्ये एकट्या विद्यार्थिनीला बोलावून अश्लील चाळे करणे, असे कृत्य करत होता असे पीडित मुलींनी तक्रारीत म्हटले आहे.

सदर शिक्षक अनेक वर्षांपासून याच शाळेत असल्याने, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर विद्यार्थिनींची छेड काढली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोपी शिक्षक गोवर्धन गोंडाणे याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
 
पेयात गुंगीचे औषध मिसळून अत्याचार
दुसरीकडे, अमरावतीत एका कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या गेट-टुगेदर पार्टीत एका विद्यार्थिनीला पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध करत तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून त्यांनी युवतीला सात-आठ महिने ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे. चेतन गणेश अंबाडकर आणि आकाश गणेश अंबाडकर (दोघेही रा. निर्मला कॉलनी, बडनेरा) अशी आरोपींची नावे असून ही घटना २६ मे २०२५ रोजी रहाटगाव येथील हॉटेलमध्ये घडल्याचा आरोप आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.