Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यभरात लालपरीची चाके थांबणार, ३ दिवसात एसटी बंदचा इशारा, नेमकं प्रकरण काय आहे?

राज्यभरात लालपरीची चाके थांबणार, ३ दिवसात एसटी बंदचा इशारा, नेमकं प्रकरण काय आहे?
 

मागण्या मान्य न झाल्यास एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून त्यासाठी सरकारला ३ दिवसांचा वेळ दिलाय. राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्यास महाराष्ट्र बंदसारखी स्थिती होऊ शकते. राज्य सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेय.  राज्यभर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय..वेतन मिळाले तरी वेतनातील फरक आणि मासिक भत्ता न मिळाल्याने एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेने सरकारला तीन दिवसांचा अवधी दिलाय.. तीन दिवसात वाढीव रक्कम मिळावी...याबाबत सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर एसटी सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय..त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे...



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.