Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक WhatsApp मेसेज अन् बँक अकाऊंट रिकामंं; 'या' धोक्यापासून वाचण्यासाठी पटकन ऑन करा 'ही' सेटिंग, आत्तापर्यंत लाखो लोक फसलेत जाळ्यात

एक WhatsApp मेसेज अन् बँक अकाऊंट रिकामंं; 'या' धोक्यापासून वाचण्यासाठी पटकन ऑन करा 'ही' सेटिंग, आत्तापर्यंत लाखो लोक फसलेत जाळ्यात
 

व्हॉट्सअॅपवर सध्या घोटाळे इतके वाढले आहेत की एक छोटासा मेसेज किंवा कॉल तुमचे संपूर्ण बँक अकाऊंट रिकामे करू शकतो. फेब्रुवारी २०२६ मध्ये लाखो लोक या जाळ्यात अडकले आहेत. नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर २०२६ ग्रीटिंग्सनंतर आता महाशिवरात्री किंवा व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा म्हणून बनावट मेसेज येत आहेत. यात लिंक किंवा APK फाइल असते.



त्यावर क्लिक केल्यावर फोनमध्ये मालवेअर शिरते, OTP चोरले जातात आणि बँक ट्रान्सफर होतात. बनावट कॉल करून बँक अधिकारी किंवा पोलिस म्हणून धमकावतात, डिजिटल अरेस्टची भीती दाखवतात. सायबर गुन्हेगार हे सगळे फेस्टिव्ह सीझनचा फायदा घेऊन करत आहेत ज्यामुळे लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी व्हॉट्सअॅपने नवीन सुरक्षा फीचर्स आणली आहेत, त्यांचा ताबडतोब वापर करा. 
 
सेटिंग्जमध्ये जा

प्रायव्हसी

अॅडव्हान्स्डमध्ये जा

'ब्लॉक अननोन अकाउंट मेसेजेस' (block unknown account message) चालू करा.

यामुळे अज्ञात नंबरवरून येणारे मोठ्या प्रमाणात मेसेज आपोआप ब्लॉक होतात. 'स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स' ऑन केल्यास अज्ञात व्यक्तींकडून मीडिया, अटॅचमेंट्स आणि लिंक प्रिव्ह्यू ब्लॉक होतात. अज्ञात कॉल सायलेंट करण्याची सुविधा देखील आहे. हे सेटिंग्ज चालू केल्याने स्कॅमरला तुमची पर्सनल माहिती मिळणे खूप कठीण होते आणि तुमचे अकाऊंट सुरक्षित राहते.

Two step verification

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा.

सेटिंग्जमध्ये जा

अकाउंटमध्ये जाऊन टू-स्टेप व्हेरिफिकेशन निवडा

६ अंकी पिन सेट करा आणि ईमेल अॅड करा.

यामुळे एखाद्याला तुमचा OTP मिळालाच तरी पिनशिवाय खाते हॅक करता येत नाही. अॅप नेहमी लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट ठेवा. unknown मेसेज, ग्रीटिंग लिंक्स, gift ऑफर्स किंवा कमी किमतीचे प्रॉडक्ट्सचे मेसेज आले तर लगेच ब्लॉक करा आणि रिपोर्ट करा. otp , बँक डिटेल्स किंवा पिन कधीही शेअर करू नका. हे छोटे पण पाऊल उलचुन तुम्ही सुरक्षित राहू शकता. संशय आल्यास ताबडतोब बँकला कळवा किंवा सायबर हेल्पलाइन १९३० वर कॉल करा. व्हॉट्सअॅप हे फक्त चॅटिंगचे माध्यम नाही, तर तुमची गोपनीयता आणि पैसे वाचवण्याचेही साधन आहे. आजच ही सेटिंग्ज चालू करा नाहीतर उद्या उशीर होऊ शकतो.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.