Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नंतर बळजबरीनं धर्मांतर करून लग्न

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नंतर बळजबरीनं धर्मांतर करून लग्न

सोलापूर : गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहाचे आमिष दाखवत तिचे फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर जबरदस्तीने धर्मांतर केले. आणि मग निकाहही लावून दिला. या खळबळजनक प्रकारणात मुख्य आरोपी इसराईल अहमद शेख याला न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात वकिलासह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

कलबुर्गी येथे वास्तव्यास असलेले इसराईल याची आत्या आणि आत्तेभाऊ हे दोघे फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. पीडितेच्या फिर्यादीवरून इसराईल शेख, त्याचा मित्र उजेब उर्फ म. हनीफ सादिक शेख, धर्मांतराचा सल्ला देणारा वकील अब्दुल्लाह सलीम खतीब, तसेच फिरोज व त्याची आई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, यासह इतर बाबींचा तपास करण्यासाठी न्यायालयाने मुख्य आरोपीस पोलिस कोठडी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अनिल राजगुरू तपास करीत आहेत. 
असे फसविले जाळ्यात..
१. पीडितेचे वडील रिक्षा चालक आहेत. पीडिता दहावीत शिकत असताना, २०२३ मध्ये इसराईल शेख तिच्या घराजवळ येऊ लागला. ती घालणाऱ्या रंगाचेच कपडे परिधान करून तिचा पाठलाग करणे, शाळेपर्यंत मागे जाणे असे प्रकार करू लागला. तिचा मोबाईल क्रमांक मिळवून संपर्क वाढवला. डिसेंबर २०२४ मध्ये मित्र उजेबच्या घरी नेऊन इसराईलने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतरही सतत भेटीचा तगादा लावला. पीडितेने नकार दिल्यानंतर, तो तिच्या आईच्या मोबाईलवर फोन व संदेश करू लागला. संशय आल्याने वडिलांनी चौकशी केली असता पीडितेने संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबाने घर बदलले.

२. नंतर पीडितेने 'जेईई' परीक्षेत चांगले गुण मिळवून अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. मात्र कॉलेजमध्ये असतानाच इसराईलने पुन्हा संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करू लागला. वर्गातील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवरून दोघांचे संभाषण सुरू झाले. सप्टेंबर २०२५ मध्ये उजेबच्या मदतीने पुन्हा अत्याचार करण्यात आला. अत्याचाराची छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला विवाहासाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्यात आले. यानंतर दोघेही विवाह करून कलबुर्गीला पळून गेले. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन सोलापुरात आणले.
वकील म्हणाला, 'धर्मांतराशिवाय विवाह मान्य नाही'

डिसेंबर २०२५ मध्ये कॉलेज सुटल्यानंतर इसराईलने पीडितेला शहर काझी कार्यालयात नेले. तेथे वकील अब्दुल्लाह खतीबने, धर्मांतर केल्याशिवाय विवाह कायदेशीर ठरणार नाही, असे सांगितले. त्यानंतर स्टॅम्पवर मजकूर टाईप करून पीडितेकडून जबरदस्तीने स्वाक्षरी करून घेण्यात आली. तिचे नाव 'आयेशा शेख' ठेवून निकाह लावण्यात आला. त्यानंतर एक महिना सोलापुरात राहू नका, असा सल्ला देत पीडितेला कलबुर्गीला नेण्यात आले, असे फिर्यादीत नमूद आहे. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, तर सरकारतर्फे ॲड. दत्तूसिंग पवार काम पाहत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.