नागपूर: राज्यात पुन्हा एकदा मेगा नोकर भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना त्यांचे आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोकरभरतीबाबत सरकार कुठेही मागे नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावर भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्यात विविध विभागात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र एक लाखाहून अधिक पदांची भरती करण्यात आली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागांना त्यांचा आकृतिबंध मंजूर करण्याचे तसेच सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या मेगाभरतीमध्ये जलसंपदा विभागातील १४ हजार पदांच्या समावेश करण्यात येणार आहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जलसंपदा विभागात जवळपास ४३ आणि २१ अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने अनेकाना नोकरीची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांची बैठक
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली
सुधारणेसंदर्भात नुकतीच बैठक झाली. राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती
प्रक्रिया राबवली जाणार आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक पदांची भरती
टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २०
हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे.
भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि
कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर
मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.
जलसंपदा विभाग सरळसेवा रिक्त पदे
गट क रिक्त पदे – ८४४६ जागागट ड रिक्त पदे – ५६०५ जागाएकूण रिक्त पदे – १४,०५१ जागापरिक्षा आयबीपीएस घेणार आहे.गट ‘क’ मधील विविध ४३ संवर्गगट ‘ड’ मधील २१ संवर्ग
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.