Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10 वी पास उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी, 50 हजार रुपयांपर्यंत पगार; कधीपर्यंत कराल अर्ज?

10 वी पास उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी, 50 हजार रुपयांपर्यंत पगार; कधीपर्यंत कराल अर्ज?


दहावी पास असणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ (EPFO) मध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. ईपीएफओने देशातील 23 क्षेत्रांमध्ये 'लोअर डिव्हिजन क्लर्क' (LDC) आणि 'कनिष्ठ सचिवालय सहाय्यक' (JSA) या पदांच्या एकूण 153 जागांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांना सरकारी सेवेत रुजू होण्याची संधी मिळणार असून, इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज कधीपर्यंत कराल?
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 मार्च पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2026 आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, अर्जदार उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी (मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराने भरतीसाठीच्या इतर सर्व अनिवार्य अटी व शर्तींची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पगार किती मिळेल?

उमेदवारांची निवड प्रामुख्याने ऑनलाइन लेखी परीक्षा, त्यानंतर शॉर्टलिस्टिंग आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,000 ते 56,900 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा 2 मे 2026 रोजी विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आतापासूनच परीक्षेच्या तयारीला लागणे फायद्याचे ठरेल.

'असा' करा अर्ज
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 'EPFO' च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. होमपेजवर संबंधित पदाच्या अधिसूचनेवर क्लिक करून तिथे दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करावी लागेल. अर्जात सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो पुन्हा एकदा तपासून घ्यावा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अधिक सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.