Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा परिषदेचे 13 शिक्षक, 1 शिपाई निलंबित

सांगली जिल्हा परिषदेचे 13 शिक्षक, 1 शिपाई निलंबित


सांगली :- दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर आवश्यक युडीआडी प्रमाणपत्र सादर न केल्याने 13 शिक्षक आणि 1 शिपाई, अशा 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ही कारवाई केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.

काळे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तसेच शासनाच्या निर्देशानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी युनिक डिसॅबिलिटी आयडी (युडीआडी) प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र सादर करण्यास संबंधित कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून वारंवार सूचना होत्या. प्रशासनानेही नोटीस दिली होती. मात्र, संबंधितांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

प्रशासनाकडून दिव्यांग प्रमाणपत्र व युडीआडी प्रमाणपत्राबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने ही कारवाई केली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी आणि सवलतींचा लाभ घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याची तुकाराम मुंढे यांनी चौकशी सुरू केली आहे. सांगलीसह राज्यातील अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, संशयास्पद वाटणाऱ्या किंवा कागदपत्रे सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने आता कडक नजर ठेवली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.